अयोध्येतील राममंदिराच्या जमीन व्यवहारातील कथित गैरप्रकारावरून भारतीय जनता पक्षाची बदनामी करण्याचा कॉँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा डाव उघड झाला आहे. भाजपला विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी १०० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा परमहंस दास यांनी केला आहे.Congress, AAP leaders offer Rs 100 crore to oppose BJP, claims Paramahansa Das
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: अयोध्येतील राममंदिराच्या जमीन व्यवहारातील कथित गैरप्रकारावरून भारतीय जनता पक्षाची बदनामी करण्याचा कॉँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा डाव उघड झाला आहे. भाजपला विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी १०० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा परमहंस दास यांनी केला आहे.
राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीन व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाला असून, २ कोटी रुपयांची जमीन पाच मिनिटांत १८.५ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आल्याचा दावा काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केला होता. यावर परमहंस म्हणाले, जमीनीच्या व्यवहारात कोणतयहीप्रकारचा गैरव्यवहार नाही.
ही सगळी राजकीय नेत्यांची खेळी आहे.आपल्याकडे १७ जून रोजी सकाळी ७ वाजता दोन व्यक्ती आल्या. यावेळी त्यांनी १०० कोटी रुपयांची ऑफर दिली आणि भाजपचा विरोध आणि आरोप करण्यास सांगितले. तसेच शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांना आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने ५० कोटी रुपये दिले असून, त्यांच्या अनुयायांनी या कामाला सुरुवात केली आहे.
उत्तर प्रदेश निवडणुकीत आम आदमी पक्ष किंवा काँग्रेसचा विजय झाल्यास आपल्याला मुख्यमंत्री करण्यात येईल, असेही त्या दोन व्यक्तींनी सांगितले आहे. आपण एक संत आहोत. राष्ट्रहित सर्वोपरी असल्याचे ठामपणे सांगितले. त्या दोन व्यक्ती आम आदमी पक्ष आणि काँग्रेसकडून पाठवण्यात आल्या होत्या.
राममंदिराच्या जमीन खरेदी प्रकरणात भाजपा आणि श्रीराम जन्मभूमी न्यास यांची बदनामी करण्याचा डाव आखला जात असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. याबाबत कॉँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांकडून सातत्याने टीका केली जात आहे. मात्र, ही जमीन नियमाप्रमाणेच खरेदी केली असल्याचे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे.
Congress, AAP leaders offer Rs 100 crore to oppose BJP, claims Paramahansa Das
महत्त्वाच्या बातम्या
- Gautam Adani : तीन दिवसांत गमावले 69 हजार कोटी, आशियातील श्रीमंतांच्या यादीतील दुसरा क्रमांकही गमावला
- नोव्हाव्हॅक्स लस प्रभावी ठरल्यानंतर आता सीरमकडून जुलैमध्ये लहान मुलांवरील चाचणीला सुरुवात
- पुतण्यावर काका वरचढ : पशुपती पारस बनले लोजपाचे नवे अध्यक्ष, राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत निर्णय
- Twitter Shares Slips : ट्विटरला मोदी सरकारशी संघर्ष महागात, 4 महिन्यांत 25 टक्क्यांनी शेअर्स घसरले
- Edible Oil Prices : सरकारने खाद्य तेलांवरील आयात शुल्क घटवले, किमतींमध्ये एवढी झाली कपात