विशेष प्रतिनिधी
चंदीगड : शिरोमणी अकाली दलाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न कॉँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप अकालीदलाचे प्रमुख सुखबिर सिंग बांदल यांनी केला आहे. घुसखोरांना पांगविण्यासाठी पोलिसांनी दंडुका आणि पाण्याच्या जोरदार फवाºयाचा वापर केला.Congress, AAP activists try to vandalise Akali Dal program by throwing stones, accused Sukhbir Singh Badal
पंजाबमधील मोगा येथे आयोजित कार्यक्रमात शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबिर सिंग बादल भाषण करीत होते. त्यावेळी काही निदर्शकांनी पोलिसांशी झटापट केली, कठडे तोडले आणि जबरदस्तीने कार्यक्रमात घुसण्यासाठी दगडफेक केली. सुखबिर सिंग बादल पंजाबमधील १०० विधानसभा मतदारसंघात शंभर दिवसांच्या यात्रेवर निघाले आहेत.
नी पत्रकारांना सांगितले की, निदर्शने करणारे शेतकरी नव्हते. परंतु, ते काँग्रेस आणि आम आदमी पाटीर्शी संबंधित होते. या घटनेत चार निदर्शक आणि तीन पोलीस जखमी झाले. पक्षाच्या रॅलीसाठी लावण्यात आलेले भव्य फलक आणि बॅनर फाडले. काही वाहनांचेही नुकसान झाले आहे.
निदर्शकांना अनेकदा बजावनूही त्यांनी जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याने बळाचा वापर करावा लागला, असे पोलीसांनी सांगितले. निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक केली तसेच कार्यक्रम स्थळानजीकचा राष्ट्रीय महामार्गही रोखला, असे मोगाचे पोलीस अधीक्षक ध्रुनम निम्बाले यांनी सांगितले.
Congress, AAP activists try to vandalise Akali Dal program by throwing stones, accused Sukhbir Singh Badal
महत्त्वाच्या बातम्या
- बिहार भाजपच्या अध्यक्षांना दुर्मिळ विकाराचे निदान
- जल्लीकट्टूमध्ये फक्त स्थानिक जातीच्या बैलांनाच परवानगी, संकरित बेलांना बंदीचा मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय
- पंजाबमध्ये भाजपाची रणनिती, हिंदूबहुल ४५ जागांवर करणार लक्ष केंद्रीत
- वेब पोर्टल्सवर नियंत्रण नसल्याने फेक न्यूज, कोणीही उठून यू ट्यूब चॅनल सुरू करतोय, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
ReplyReply allForward
|