खलिस्तानी संघटनांना निधी पुरवल्याच्या आरोपात एनआयएने नुकती लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा देशातील एजन्सींसाठी मोठे आव्हान बनला आहे. लॉरेन्स बिश्नोई सध्या तुरुंगात असला तरी त्याच्या दहशतीचे पडसाद दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमध्ये उमटत आहेत. सध्या मुद्दा या गँगस्टरच्या भीतीबद्दल नसून, त्याच्या कुबलीजबाबाबद्दल आहे. ज्याचा उल्लेख राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) आरोपपत्रात आहे. Confessions of gangster Lawrence Bishnoi Some leaders and professionals make threatening phone calls themselves to get security
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गँगस्टर बिश्नोईने चौकशीदरम्यान खुलासा केला की राजकारणी आणि व्यावसायिक त्याला धमकीच्या कॉलच्या बदल्यात पैसे देतात, जेणेकरून त्यांना पोलीस संरक्षण मिळू शकेल.
नुकतीच, एनआयएने खलिस्तानी संघटनांना निधी पुरवल्याच्या आरोपात लॉरेन्स बिश्नोई याची चौकशी केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार लॉरेन्स बिश्नोईने कबूल केले आहे की तो दारू विक्रेते, कॉल सेंटर मालक, ड्रग सप्लायर आणि रिअल इस्टेट व्यावसायिकांकडून दर महिन्याला अडीच कोटी रुपये उकळत आहे. बिश्नोई यांनी असा दावाही केला की, आजकाल अनेक राजकारणी आणि व्यापारी पोलिसांकडून संरक्षण मिळवण्यासाठी त्याला खंडणीचे धमकीचे कॉल करण्यासाठी पैसे देत आहेत. एजन्सीने संपूर्ण तपशील देत याबाबत गृह मंत्रालयाला कळवले आहे.
Confessions of gangster Lawrence Bishnoi Some leaders and professionals make threatening phone calls themselves to get security
महत्वाच्या बातम्या
- ‘’राष्ट्रवादीला दाखविण्यापुरते ओबीसी नावे लागतात आणि…’’ फडणवीसांचा थेट निशाणा!
- फडणवीसांचे पवारांना प्राथमिक शाळेतले “धडे”; “वासुनाका”कार भाऊ पाध्येंचे वाचा बोल खडे!!
- ‘’मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचा होतो, याने इतिहास बदलत नाही’’ फडणवीसांचा शरद पवारांना टोला!
- मणिपूर मधल्या हिंसाचाराचे मूळ कारण काँग्रेसचेच फूटपाडे धोरण; राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रात स्थानिक नेत्याचा आरोप