• Download App
    म्यानमारमधील संघर्षांचा लाखो नागरिकांना फटका, लाखो जण देश सोडण्याच्या तयारीत। Condition in Myanmar worsoned

    म्यानमारमधील संघर्षांचा लाखो नागरिकांना फटका, लाखो जण देश सोडण्याच्या तयारीत

    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क : म्यानमारमध्ये फेब्रुवारीपासून लष्कर आणि आंदोलक यांच्यात सुरु असलेल्या संघर्षामुळे सुमारे १० हजार जण भारत आणि थायलंडमध्ये पळून गेले आहेत. म्यानमारमधील स्थितीबाबतचा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत आज मंजूर झाला. म्यानमारसह ११९ देशांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर फक्त बेलारुसने ठरावाच्या विरोधात मतदान केले. शिवाय, भारत, बांगलादेश, भूतान, चीन, नेपाळ, लाओ आणि थायलंड हे शेजारी देश, तसेच रशिया यांनी मतदानात भाग घेतला नाही. Condition in Myanmar worsoned



    ‘म्यानमारमधील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत असून जनता भयाच्या वातावरणात रहात आहे. त्यांच्या मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीत. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नगारिकांनी आता स्वत:चेच सशस्त्र गट तयार केले असून सशस्त्र संघटनांकडून ते प्रशिक्षण घेत आहेत. गेल्या अनेक दशकांमध्ये जिथे संघर्ष झाला नव्हता, तिथेही संघर्षाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीमुळे देशभरात, विशेषत: चीन, भारत आणि थायलंडच्या सीमेला लागून असलेल्या गावांमधील नागरिकांचे लोंढे शेजारच्या देशांमध्ये जात आहेत.’’

    Condition in Myanmar worsoned

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य