नाशिक : नवी दिल्ली, पुणे आणि लखनऊ पाठोपाठ जयपूरला आंदोलन करायला गेलेल्या CJP अभिजीत दिपके वर आज “केजरीवाल प्रयोग” झाला. जयपूर मधल्या आंदोलनादरम्यान एकाने गर्दीतून येऊन अभिजीत दिपके याच्या कानाखाली जाळ काढला. त्यामुळे आंदोलनात मोठी खळबळ उडाली आणि अभिजीत दिपकेला मारहाण झाल्याची बातमी देशभर पसरली. Abhijeet Deepke
– आधीच्या आंदोलनांमध्ये शांतता
“नीट” परीक्षेच्या घोटाळ्याच्या विरोधात अभिजीत दिपके याने भारतात येऊन सुरुवातीला राजधानी नवी दिल्लीतल्या जंतर-मंतरवर आंदोलन केले. त्यानंतर पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठात आंदोलन केले. त्यानंतर लखनऊ मध्ये जाऊन आंदोलन केले. या तिन्ही आंदोलनांना लिबरल लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला. ही तिन्ही आंदोलने शांततेत झाली. लखनऊ मधल्या आंदोलनातून अभिजीत दिपकेला हाकलून दिल्याच्या बातम्या आल्या. पण त्यात कुठेही शांततेचा भंग झाला नव्हता.
– जयपूर मध्ये मात्र कानाखाली जाळ
आज मात्र अभिजीत दिपके याला राजस्थानची राजधानी जयपूर मध्ये “केजरीवाल प्रयोग” सहन करावा लागला. अभिजीत दिपके जयपूर मध्ये आंदोलन करत असताना काही युवक त्या आंदोलनामध्ये घुसले. ते अभिजीत पर्यंत पोहोचले आणि त्यांनी अभिजीतला कानशिलात मारले. त्यामुळे तिथे काहीसा गोंधळ झाला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून अभिजीत दिपकेला गर्दीतून सुरक्षित बाहेर काढले.
– केजरीवाल प्रयोग
अभिजीत दिपकेला जयपूर मध्ये ज्या पद्धतीने युवकांनी कानशिलात मारले, त्याच पद्धतीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर देखील “प्रयोग” झाला होता. 2019 मध्ये ते विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा रोड शो करत होते. त्या वेळी अचानक एक युवक त्यांच्या जीप वर चढला आणि त्यांना थप्पड मारली. त्यामुळे प्रचंड खळबळ निर्माण झाली. केजरीवालांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा कांगावा केला, पण तो थप्पड मारणारा युवक आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता असल्याचेच निष्पन्न झाले. त्यामुळे केजरीवालांची नौटंकी फेल गेली.
Cockroach Janata Party founder Abhijeet Deepke was allegedly assaulted
महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगे आले आणि रोहित पवारांनाच टोले हाणून गेले!!
- Pranit More : ‘माझ्यावरची टीका योग्यच’; वादानंतर प्रणित मोरेची जाहीर माफी, म्हणाला- ‘एक संधी द्या, स्वतःला बदलून दाखवेन’
- रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस; पण बॉडी लँग्वेज मध्ये ना थकावट, ना उत्साहात कमी!!
- Ram Mandir : राम मंदिरातील दानपेटी घोटाळ्याची SIT चौकशी; कर्मचाऱ्याला ताब्यात, शेणात लपवलेले 10 लाख रुपये जप्त