• Download App
    ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का : निकटवर्तीय अणुव्रत मंडल यांना अटक, 8 आयपीएस अधिकाऱ्यांना समन्स|Coal Scam Another blow to Mamata Banerjee Close associate Anuvrat Mandal arrested, 8 IPS officers summoned

    ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का : निकटवर्तीय अणुव्रत मंडल यांना अटक, 8 आयपीएस अधिकाऱ्यांना समन्स

    वृत्तसंस्था

    कोलकाता : मंत्री पार्थ चटर्जी यांच्या अटकेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक झटका बसला. जनावरांच्या तस्करी प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे नेते अणुव्रत मंडल आणि त्यांचा अंगरक्षक सहगल हुसेन यांना गुरुवारी सीबीआयने अटक केली.Coal Scam Another blow to Mamata Banerjee Close associate Anuvrat Mandal arrested, 8 IPS officers summoned

    पहाटे सीबीआयच्या 10 अधिकाऱ्यांचे पथक तृणमूल काँग्रेसच्या बीरभूम जिल्हाध्यक्षांच्या घरी पोहोचले. त्यांची एक तास कसून चौकशी केली. परंतु चौकशीत सहकार्य न केल्याचा ठपका ठेवून मंडल यांना अटक करण्यात आली. दुभत्या जनावरांच्या तस्करीत त्यांचा हात असल्याचे सबळ पुरावे असल्याचा दावा सीबीआयने केला आहे.



    यापूर्वी दोन वेळा प्रकृतीच्या कारणास्तव मंडल यांनी सीबीआय चौकशीस सामोरे जाणे टाळले होते. डॉक्टरांनी त्यांना बेड रेस्टचा सल्ला दिला होता. त्यामुळे आता सीबीआय बोलपूर रुग्णालयाच्या डॉक्टरचीही चौकशी करणार आहे.

    कोळसा घोटाळ्यात 8 अधिकाऱ्यांची चौकशी

    कोळसा घोटाळाप्रकरणी पश्चिम बंगालमधील आयपीएसच्या 8 अधिकाऱ्यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी दिल्लीत पाचारण केले आहे. ज्ञानवंत सिंह, कोटेश्वर राव, एस.सेल्वामुरुगन, श्यामसिंह, राजीव मिश्रा, सुकेश जैन आणि तथागत बसू अशी त्यांची नावे आहेत. 21 ते 31 ऑगस्टदरम्यान त्यांची चौकशी होईल.

    काय आहेत आरोप?

    कोळसा उत्खनन आणि तस्करी होत असलेल्या जागी या अधिकाऱ्यांची नियुक्ती होती. अधिकाऱ्यांना याची माहिती असूनही त्यांनी सर्व गैरप्रकारांकडे दुर्लक्ष केल्याचा ईडीचा आरोप आहे. शासकीय वाहनांमधून रोकड पाठवली जात असताना काही पोलिस अधिकाऱ्यांचाही त्यामध्ये हात होता. कोळसा घोटाळाप्रकरणी नोव्हेंबर 2020 मध्ये ईडीने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.

    Coal Scam Another blow to Mamata Banerjee Close associate Anuvrat Mandal arrested, 8 IPS officers summoned

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य