विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह सर्व मंत्र्यांनी संपत्ती जाहीर केली आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांपेक्षाही त्यांचे अनेक मंत्री श्रीमंत असल्याचे आढळून आले आहे. नितीशकुमार यांच्याकडील संपत्तीमध्ये १३ गायी, ९ वासरे आणि एका शिलाई मशीनचाही समावेश आहे. अनेक मंत्र्यांकडे दहा कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे.CMs minister more rich , Nitish Kumar has 13 cows and 9 calves more than the Chief Minister
राज्याच्या परिवहन मंत्र्यांसह अनेक मंत्र्यांकडे आपले वाहनही नाही. काही मंत्र्यांवर मोठे कर्ज आहे. नितीशकुमार यांच्यापेक्षा अधिक संपत्ती त्यांचा मुलगा निशांतकुमार यांच्याकडे आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या संपत्तीत एका शिलाई मशिनचाही उल्लेख केला आहे.
नितीशकुमार यांची एकूण संपत्ती ७५ लाख ३६ हजार ६२६ रुपये आहे. त्यांचे चिरंजीव निशांत यांच्याकडे तीन कोटी ६२ लाखांपेक्षा अधिक संपत्ती आहे. ही पिढीजात संपत्ती असल्याचे सांगितले जात आहे. अचल संपत्ती ५८,८५,००० रुपये आहे. त्यांच्या नावावर संसद विहार को-आॅपरेटिव्ह ग्रुप हाऊसिंग कॉलनी, व्दारका, दिल्ली येथे एक फ्लॅट आहे. त्यांच्याकडे १३ गायी, ९ वासरे, १३ हजार रुपयांची व्यायामाची सायकल आहे.
निशांत यांची चल संपत्ती १,६३,७९,४२२ रुपये तर, अचल संपत्ती १,९८,६९,६१४ रुपये आहे. नितीशकुमार यांच्याकडे २९,३८५ रुपये नगदी आहेत. तर, निशांत यांच्याकडे १६,५४९ रुपये आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेतून एक लाख रुपयांचा लॅपटॉप घेऊन ठेवला आहे.
नितीशकुमार हे २०१५ चे मॉडल असलेली फोर्ड इको स्पोर्ट कार वापरतात. याची सध्याची किंमत ११ लाख ३२ हजार आहे. मुलाच्या नावावर हुंदई ग्रँड आय -१० आहे. मुख्यमंत्र्यांकडे ९४ हजार ६०० रुपयांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या आहेत.
संजय कुमार झा, मुकेश सहनी, रामसूरत राय, सम्राट चौधरी या मंत्र्यांकडे सर्वाधिक संपत्ती आहे. उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्याकडे २.२८ कोटींची संपत्ती आहे. उपमुख्यमंत्री रेणु देवी यांच्याकडे ४२ लाखांची चल संपत्ती आहे.
CMs minister more rich , Nitish Kumar has 13 cows and 9 calves more than the Chief Minister
महत्त्वाच्या बातम्या
- स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त ७५ कोटी लोक घालणार सूर्यनमस्कार, केंद्रीय अनुदान आयोगाचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्याचे आवाहन
- राजकारणासाठी अर्थकारण पणाला, अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात केली मोफत वीजेची घोषणा
- मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरने दिली जॅकलीनसोबतच्या संबंधांची कबुली
- सरकारी बस चालविण्याच्या हट्टासाठी तरुणीने परिवहन मंत्र्यांची गाडीच अडवली