एकट्या पश्चिम बंगालमध्ये CBIकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची संख्या संपूर्ण भारतापेक्षा जास्त आहे.
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसच्या आमदाराला अटक आणि अनेक प्रकरणांच्या सीबीआय चौकशीच्या आदेशावरून प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मंगळवारी प्रदेश काँग्रेस कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अधीर रंजन चौधरी म्हणाले की, ममता बॅनर्जींची जादू ओसरली आहे. आता तृणमूल काँग्रेस सोडून अनेक नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. खरगपूरमधील पापिया चक्रवर्ती काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांना पक्षात येण्याची गरज भासू लागली आहे. CM Mamata Banerjees magic is fading away Adhir Ranjan Chowdhury WB Congress President
अधीर रंजन चौधरी म्हणाले, “मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची जादू ओसरत चालली आहे आणि मोठ्या संख्येने लोक काँग्रेसमध्ये सामील होत आहेत. काळाच्या ओघात ममता बॅनर्जींचे सर्व भ्रम दूर होईल. प्रत्येक जिल्हा (पश्चिम बंगाल) पीडित आहे आणि एकट्या पश्चिम बंगालमध्ये सीबीआयकडे प्रलंबित प्रकरणांची संख्या संपूर्ण भारतापेक्षा जास्त आहे. टीएमसी नेते पश्चिम बंगालच्या जनतेची लूट करत आहेत.’’
अधीर रंजन चौधरी सतत ममता बॅनर्जींवर टीका करत आहेत आणि TMC भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप करत आहेत. दुसरीकडे, टीएमसीचे नेतेही काँग्रेसवर सातत्याने हल्लाबोल करताना दिसत आहेत. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस, भाजपा आणि माकप यांच्यात संगनमत असल्याचा आरोपही केला होता.
CM Mamata Banerjees magic is fading away Adhir Ranjan Chowdhury WB Congress President
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधी येण्याऐवजी वेणूगोपाल मातोश्रीवर आले; उद्धव यांनाच सोनिया दरबारी हजर राहण्याचे निमंत्रण देऊन गेले!!
- नितीश कुमारांच्या राज्यात वाळू माफियांची वाढली मुजोरी; महिला अधिकाऱ्यास मारहाण करत, फरटपत नेले!
- Karnataka Elections 2023 : भाजपाने उमेदवारांची तिसरी यादी केली जाहीर; सर्वच राजकीय पक्षांनी कसली कंबर!
- राहुल गांधी नव्हे, वेणुगोपाल मातोश्रीवर; सावरकर ते राष्ट्रवादीतील संभाव्य फूट मुद्द्यांवर चर्चा!!