• Download App
    कथित बिटकॉईन गैरव्यवहारावरून काँग्रेस राजकारण – बोम्मई यांचा हल्लाबोल|CM Bommai targets Congress in Karnataka

    कथित बिटकॉईन गैरव्यवहारावरून काँग्रेस राजकारण – बोम्मई यांचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी

    बंगळूर – कथित बिटकॉईन गैरव्यवहारावरून काँग्रेस राजकारण करीत असल्याची टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे. याप्रकरणी पुरावे असल्यास विरोधी पक्षांनी ते चौकशी संस्थांना द्यावेत, असे आव्हानही त्यांनी दिले.CM Bommai targets Congress in Karnataka

    ते म्हणाले की पुरावे असतील तर ते सक्तवसुली संचालनालय किंवा पोलिसांना द्यावेत, त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल असे मी म्हणालो आहे. यात काही तथ्य असल्यास चौकशी केली जाईल. मुळातच आधार नसलेले प्रकरण लावून धरणे हे दुसरे काही नसून निव्वळ राजकारण आहे.



    जिथे आधारच नाही तेथे तुम्ही कथा रचू शकत नाही.बंगळूरमधील एका हॅकरकडून केंद्रीय गुन्हे नऊ कोटी रुपये मूल्य असलेली बिटकॉईन जप्त केली. श्रीकृष्ण ऊर्फ श्रीकी असे त्याचे नाव आहे. सरकारी संकेतस्थळे हॅक करणे,

    इंटरनेटच्या माध्यमातून काळा बाजार करून अंमली पदार्थांचा व्यवहार करणे आणि त्यासाठी क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून रक्कम देणे असेही आरोप त्याच्यावर आहेत. या प्रकरणात सत्ताधारी भाजपचे वरिष्ठ नेते, त्यांचे कुटुंबीय आणि वरिष्ठ अधिकारी सामील असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.

    CM Bommai targets Congress in Karnataka

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र