• Download App
    राजस्थानमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची आपसातच तुंबळ हाणामारी; वरिष्ठ नेत्याने संधी मिळताच घेतला काढता पाय Clashes among Congress workers in Rajasthan

    राजस्थानमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची आपसातच तुंबळ हाणामारी; वरिष्ठ नेत्याने संधी मिळताच घेतला काढता पाय

    हाणामारीत दोन्ही बाजूंनी खुर्च्यांची जोरदार फेकाफेक झाली

    विशेष प्रतिनिधी

    अलवर : राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातून एक घटना समोर आली आहे. अलवरच्या बेहरोरमध्ये काल काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली, तिथे ब्लॉक काँग्रेस आणि युवक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. हाणामारीत दोन्ही बाजूंनी खुर्च्यांची जोरदार फेकाफेक झाली. Clashes among Congress workers in Rajasthan

    अलवरच्या बेहरोर शहरातील एका खासगी सभागृहामध्ये झालेल्या ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या बैठकीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी ब्लॉक काँग्रेस कार्यकर्त्यांची हाणामारी झाली. काँग्रेस कार्यकर्ते आणि ब्लॉक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लाथा-बुक्क्यांनी जोरदार मारहाण केली आणि खुर्च्यांचाही फेकाफेक केली. बेहरोरमध्ये पक्ष आणि संघटना मजबूत करण्यासाठी रणनीती आखण्यासाठी ब्लॉक काँग्रेस कमिटी बेहरोर आणि मजरीकलां यांची बैठक बोलावण्यात आली होती. दरम्यान, कार्यकर्त्यांमध्ये वादावादी होऊन त्यांनी आपापसात हाणामारी केली.

    कार्यकर्त्यांमधील हाणामारी पाहून अनेक बड्या नेत्यांना हस्तक्षेप करावा लागला. अनेक नेत्यांनी मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला मात्र प्रकरण इतक्या सहजतेने हाताळले जात नव्हते. दुसरीकडे परिस्थिती अधिक चिघळल्याचा अंदाज घेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेश शर्मा यांनी मध्यस्थी करण्याऐवजी संधी मिळताच तेथून काढता पाय घेतल्याचे दिसून आले.

    राजस्थानमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आता गटबाजी सर्रास दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील संबंधही चांगले चालले नव्हते. दोघांमधील नाराजी बराच काळ टिकली. नुकतेच राजेंद्र गुढा यांनी मंत्रिपदावरून हकालपट्टी केल्यानंतर सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी आपल्या वक्तव्यात एका लाल डायरीचाही उल्लेख केला होता, ज्यामध्ये त्यांनी आरोप केला होता की या लाल डायरीच्या माध्यमातून मुख्यमंत्री गेहलोत यांच्या अनेक जवळच्या मित्रांचा पर्दाफाश केला जाऊ शकतो.

    Clashes among Congress workers in Rajasthan

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार