विशेष प्रतिनिधी
अमरावती : CJI Bhushan Gavai सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले भूषण गवई यांनी निवृत्तीनंतर कोणतेही शासकीय लाभाचे पद स्वीकारणार नसल्याचे म्हटले आहे. मी निवृत्तीनंतर जास्तीत जास्त वेळ दारापूर, अमरावती आणि नागपुरात या आपल्या मूळ गावी घालवणार असल्याचे गवई यांनी म्हटले आहे. सरन्यायाधीश झाल्यानंतर प्रथमच भूषण गवई हे त्यांच्या मूळ गाव असलेल्या दारापुरात पोहोचले होते. यावेळी ते गावकऱ्यांशी बोलत होते.CJI Bhushan Gavai
सरन्यायाधीश भूषण गवळी यांचे गावातील नागरिकांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. सरन्यायाधीशांना पाहण्यासाठी गावकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गावात पोहोचताच गवई यांनी आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच जुन्या घराला देखील भेट दिली.
यावेळी सरन्यायाधीश यांनी विकंदर महाराज, राजे बुवा महाराज, हनुमान मंदिर आदी ठिकाणी भेट देऊन दर्शन घेतले. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीशांचे अगदी उत्साहात स्वागत केले. तसेच भारत माता की जय, अशा घोषणा दिल्या. एकोप्याने राहणाऱ्या गावाचे प्रतीक म्हणजे दारापूर गाव असल्याचे सरन्यायाधीश यांनी म्हटले आहे.
न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे 52वे सरन्यायाधीश आहेत. त्यांचा जीवनप्रवास महाराष्ट्रातील अमरावती पासून सर्वोच्च न्यायालयापर्यंतचा एक प्रेरणादायी प्रवास आहे.
बालपण आणि कुटुंब
भूषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावती, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे वडील, आर. एस. गवई, हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) चे नेते होते आणि त्यांनी बिहार, सिक्कीम आणि केरळ या राज्यांचे राज्यपाल म्हणून देखील सेवा दिली. ते लोकसभेचे सदस्यही होते. गवई कुटुंब डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित असून, बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. त्यांचे बंधू, राजेंद्र गवई, हेही राजकारणात सक्रिय आहेत.
सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली
भूषण गवई हे भारताचे पहिले बौद्ध सरन्यायाधीश आहेत आणि अनुसूचित जातींमधून हे पद भूषवणारे दुसरे न्यायाधीश आहेत. त्यांनी सामाजिक आणि राजकीय न्यायासाठी डॉ. आंबेडकरांच्या विचारांना अनुसरून काम करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. त्यांचा जीवनप्रवास हा सामाजिक न्याय, समर्पण आणि कष्टाच्या मूल्यांचा आदर्श आहे. त्यांच्या नेतृत्वात भारतीय न्यायव्यवस्थेतील समावेशिता आणि विविधता अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा आहे.
नोटाबंदीचे समर्थन केले होते
न्यायमूर्ती गवई हे देशातील दुसरे दलित सरन्यायाधीश असतील. त्यांच्या आधी न्यायमूर्ती केजी बालकृष्णन हे भारताचे पहिले दलित सरन्यायाधीश झाले होते. 2007 मध्ये न्यायमूर्ती बालकृष्णन सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून, न्यायमूर्ती गवई यांनी अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यामध्ये मोदी सरकारच्या 2016 च्या नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करणे आणि निवडणूक रोखे योजना असंवैधानिक घोषित करणे समाविष्ट आहे.
निवृत्तीनंतर राजकारणात येण्याची शक्यता फेटाळून लावली
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर. निवृत्तीनंतर राजकारणात येण्याची शक्यता गवई यांनी फेटाळून लावली आहे. ते म्हणाले की, सरन्यायाधीशपद भूषवल्यानंतर एखाद्या व्यक्तीने कोणतीही जबाबदारी घेऊ नये. केशवानंद भारती प्रकरणातील निकालाचा हवाला देत न्यायमूर्ती गवई यांनी त्यांच्या बौद्ध धर्माबद्दल, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी मालमत्ता जाहीर करण्याचे महत्त्व आणि संविधानाच्या सर्वोच्चतेबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले- बुद्ध पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर देशाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेणे ही माझ्यासाठी खूप मोठी सौभाग्याची गोष्ट आहे. ते म्हणाले की- पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या वेळी सरन्यायाधीश संजीव खन्ना देशात नव्हते, म्हणून मी त्यांची परवानगी घेतली आणि संपूर्ण न्यायालयाला बोलावले. हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी न्यायालयात दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.
CJI Bhushan Gavai: No Government Post After Retirement
महत्वाच्या बातम्या
- कम्युनिस्टांना गाझाचा कळवळा, उच्च न्यायालयाने खडसावत म्हटले देशाच्या प्रश्नांवर बोला!
- Anjali Damania : धनंजय मुंडे कोणत्याही अंगाने स्वच्छ नाहीत, पुन्हा मंत्रिमंडळात संधी देऊ नये, अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- Anil Ambani : अनिल अंबानींच्या कंपन्यांवर ईडीचे छापे: ३,००० कोटींच्या कर्ज घोटाळ्याची चौकशी सुरू
- राहुल गांधी म्हणाले, मोदींमध्ये काही दम नाही; मग काँग्रेसवाले मोदींना हरविण्याऐवजी त्यांच्या रिटायरमेंटची का वाट बघताहेत??