• Download App
    मुस्लिम मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी नाशकात शहर काझींनी 7 निकाह पुढे ढकलले!! City Qazis postpone 7 Nikahs in Nashik to increase Muslim voter turnout

    मुस्लिम मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी नाशकात शहर काझींनी 7 निकाह पुढे ढकलले!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : नाशिक जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदानाचा टक्का वाढवावा, या हेतूने नाशिक शहरात उद्या 20 मे 2024 सोमवारी होणारे 7 निकाह शहर काझींनी पुढे ढकलले आहेत. लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानाचा टक्का वाढायला हवा. त्यामुळे सोमवारी होणारे निकाह आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून ते पुढे ढकलले अशी माहिती स्वतः शहर ए काझी एजाज काझी यांनी दिली.  City Qazis postpone 7 Nikahs in Nashik to increase Muslim voter turnout



    महाराष्ट्रात पहिल्या चार टप्प्यांमध्ये मतदानाचा टक्का इतर राज्यांपेक्षा घसरलेला दिसला तर सर्व राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी 60 % ते 65 % अशी ओलांडली असताना महाराष्ट्रातले मतदान 55 % च्या रेंजमध्ये राहिले.

    या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातला मुसलमान मतांचा टक्का वाढवण्यासाठी शहर ए काझी एजाज काझी आणि मुस्लिम धर्मगुरू शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन खतीब यांनी सोमवारी होणारे 7 निकाह आणि अन्य सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले. आता हे 7 निकाह मंगळवारी म्हणजे 21 जून रोजी होणार आहेत, तसेच सार्वजनिक कार्यक्रम आहे इतर दिवशीच होणार आहेत.

    City Qazis postpone 7 Nikahs in Nashik to increase Muslim voter turnout

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!