अमेरिकन कंपनी मॉडनार्ची कोरोना प्रतिबंधात्मक एक डोस असलेली लस भारतात लवकर आणण्यासाठी सिप्ला कंपनीने तयारी केली आहे. यासाठी केंद्र सरकारकडे काही सूट देण्याची विनंती केली आहे. मॉडर्नासोबत १ अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास ७२५० कोटी रुपए देण्याचा करारही करण्याची सिप्लाची तयारी आहे.Cipla to introduce modern preventive vaccine in India, Rs 7250 crore deal ready
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अमेरिकन कंपनी मॉडनार्ची कोरोना प्रतिबंधात्मक एक डोस असलेली लस भारतात लवकर आणण्यासाठी सिप्ला कंपनीने तयारी केली आहे. यासाठी केंद्र सरकारकडे काही सूट देण्याची विनंती केली आहे.
मॉडर्नासोबत १ अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास ७२५० कोटी रुपए देण्याचा करारही करण्याची सिप्लाची तयारी आहे.अमेरिकेच्या मॉडर्ना या कंपनीला अब्ज डॉलर्सची रक्कम देण्याच्या तयारीतही असल्याचे सिप्ला कंपनीने म्हटले आहे.
मॉडनार्ला कोणत्याही नुकसानीच्या स्थितीत सुरक्षा देणं, मूल्य निश्चित करण्याच्या सीमेपासून सूट देणं आणि भारतात चाचणी करण्यासाठी आवश्यक अटी आणि सीमा शुल्कात सूट देण्याची विनंती केली आहे.
मॉडनार्सोबत आपली चर्चा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. तसंच हे यशस्वी होण्यासाठी त्यांना सरकारचे समर्थन आणि भागीदारीचीही आवश्यकता आहे.देशात लसींचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नाचे सिप्लाद्वारे कौतुक करण्यात आले.
सिप्लानं चार बाबींवर सरकारकडून सूट देण्याची विनंती केल्याची माहिती याच्याशी निगडीत असलेल्या सूत्रांकडून देण्यात आली. याच्या मूल्याबाबत मयार्दा नसेल, नुकसान झाल्यास सुरक्षा दिली जाईल,
लसीच्या भारतातील चाचणीतून सूट आणि सीमा शुल्कातून सूट अशा त्यांच्या मागण्या आहेत. केंद्रानं यावर सकारात्मक प्रतिसाद दिल्यास कंपनी मॉडनार्सोबत १ अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास ७२५० कोटी रुपए देण्याचा करार करेल,
असं कंपनीनं म्हटलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर २९ मे रोजी कंपनीनं सरकारकडे ही विनंती केली आहे.
Cipla to introduce modern preventive vaccine in India, Rs 7250 crore deal ready
महत्त्वाच्या बातम्या
- निर्बंधाविना पंढरपूरची निवडणूक मग निर्बंधासह वारी का नाही? वारकऱ्यांचा सवाल, न्यायालयात जाण्याचा इशारा
- सुरक्षित गुंतवणुकीचा फंडा ओळखा
- संरक्षणक्षेत्रात आत्मनिर्भरतेचा गजर, १०८ प्रकारच्या लष्करी साहित्याच्या आयातीवर केंद्राची बंदी
- प्रधानमंत्री आवास योजनेतून गरीबांना निवारा आणि १ कोटी २० लाख लोकांना रोजगार
- हनी ट्रॅप स्कँडलप्रकरणी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची होणार चौकशी
- राजस्थानात कोरोना लसी चक्क कचऱ्यात फेकल्या, अडीच हजारांहून अधिक डोस वाया