Friday, 2 May 2025
  • Download App
    आर्थिक निर्बंधांसह देशात इतर कठोर उपाययोजना राबवा, उद्योजकांच्या शिखर संस्थेचीच सूचनाकोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ‘सीआयआय’ची केंद्राला सूचना मुंबई - कोरोना साखळी तोडण्यासाठी आर्थिक व्यवहारांवर निर्बंध लादण्यासह देशभर इतर कठोर उपाययोजना करण्यात याव्यात, अशी सूचना कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) या उद्योग संघटनेने केंद्र सरकारला केली आहे. सीआयआय चे अध्यक्ष उदय कोटक यांनी म्हटले आहे. सध्या लोकांचे जीव वाचवणे हेच महत्त्वाचे आहे आणि देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित झाल्याशिवाय कोणीच सुरक्षित राहू शकणार नाही. वैद्यकीय सामुग्रीची वाहतूक व अन्य बाबींसाठी स्थानिक प्रशासनाच्या मदतीला सेना दले वा अन्य सशस्त्र दले बोलवावीत. सध्या रिक्त असलेल्या शाळा-महाविद्यालयांमध्ये कोव्हिड सेंटर उभारावीत, तसेच तेथे कोव्हिड चाचणी केंद्रे व लसीकरण केंद्रेही उभारावीत. रुग्णालयांची सुरक्षा व्यवस्था वाढवावी, निवृत्त वैद्यकीय कर्मचारी, वैद्यक प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी यांचा आरोग्य सेवेसाठी वापर करावा. सध्या कोरोना फैलावाची गती पाहता वैद्यकीय सामुग्री मोठ्या प्रमाणात लागणार आहे. वैद्यक कर्मचाऱ्यांवरील ताणही वाढत असून वाढत्या रुग्णसंख्येसाठी हे कर्मचारीही अपुरे पडत आहेत. त्यामुळे या संकटाला तोंड देण्यासाठी देशी-परदेशी तज्ज्ञांनी दिलेला लॉकडाऊनचा सल्ला मान्य करून सर्वोच्च पातळीवरील कठोर उपाययोजना कराव्यात, असे ‘सीआयआय’चे अध्यक्ष उदय कोटक यांनी सुचवले आहे. CII urges govt. to adopt lockdown as option

    आर्थिक निर्बंधांसह देशात इतर कठोर उपाययोजना राबवा, उद्योजकांच्या शिखर संस्थेचीच सूचना

    कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ‘सीआयआय’ची केंद्राला सूचना


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – कोरोना साखळी तोडण्यासाठी आर्थिक व्यवहारांवर निर्बंध लादण्यासह देशभर इतर कठोर उपाययोजना करण्यात याव्यात, अशी सूचना कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) या उद्योग संघटनेने केंद्र सरकारला केली आहे. CII urges govt. to adopt lockdown as option

    सीआयआय चे अध्यक्ष उदय कोटक यांनी म्हटले आहे. सध्या लोकांचे जीव वाचवणे हेच महत्त्वाचे आहे आणि देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित झाल्याशिवाय कोणीच सुरक्षित राहू शकणार नाही.
    वैद्यकीय सामुग्रीची वाहतूक व अन्य बाबींसाठी स्थानिक प्रशासनाच्या मदतीला सेना दले वा अन्य सशस्त्र दले बोलवावीत. सध्या रिक्त असलेल्या शाळा-महाविद्यालयांमध्ये कोव्हिड सेंटर उभारावीत, तसेच तेथे कोव्हिड चाचणी केंद्रे व लसीकरण केंद्रेही उभारावीत. रुग्णालयांची सुरक्षा व्यवस्था वाढवावी, निवृत्त वैद्यकीय कर्मचारी, वैद्यक प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी यांचा आरोग्य सेवेसाठी वापर करावा.

    सध्या कोरोना फैलावाची गती पाहता वैद्यकीय सामुग्री मोठ्या प्रमाणात लागणार आहे. वैद्यक कर्मचाऱ्यांवरील ताणही वाढत असून वाढत्या रुग्णसंख्येसाठी हे कर्मचारीही अपुरे पडत आहेत. त्यामुळे या संकटाला तोंड देण्यासाठी देशी-परदेशी तज्ज्ञांनी दिलेला लॉकडाऊनचा सल्ला मान्य करून सर्वोच्च पातळीवरील कठोर उपाययोजना कराव्यात, असे ‘सीआयआय’चे अध्यक्ष उदय कोटक यांनी सुचवले आहे.

    CII urges govt. to adopt lockdown as option

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Siren system : भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये वाढली भीती, ‘या’ शहरांमध्ये बसवले सायरन सिस्टीम

    Waves Summit वेव्ह्ज शिखर संमेलनातून भारताच्या सांस्कृतिक अन् सर्जनशील शक्तीचा जागतिक उदय

    Pahalgam attack : पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर “गायब”; पण ISI च्या प्रेस रिलीज मध्ये दाखवला रणगाड्यावर उभा!!