• Download App
    सीआयडीने चंद्राबाबू नायडूंविरुद्ध चौथा गुन्हा दाखल केला; बेकायदेशीर दारू दुकानांना परवाने वितरीत केल्याचा आरोप|CID registers fourth case against Chandrababu Naidu; Accused of distributing licenses to illegal liquor shops

    सीआयडीने चंद्राबाबू नायडूंविरुद्ध चौथा गुन्हा दाखल केला; बेकायदेशीर दारू दुकानांना परवाने वितरीत केल्याचा आरोप

    वृत्तसंस्था

    अमरावती : सीआयडीने आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात चौथा गुन्हा दाखल केला आहे. ताजे प्रकरण दारू दुकानांच्या परवान्याशी संबंधित आहे. मागील सरकारच्या काळात अवैध दारू दुकानांना परवाने दिल्याचा नायडूंवर आरोप आहे.CID registers fourth case against Chandrababu Naidu; Accused of distributing licenses to illegal liquor shops

    वकील सुनाकारा कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, चंद्राबाबू यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक (पीसी) कायदा 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात चंद्राबाबूंना आरोपी क्रमांक 3 करण्यात आले आहे.



    अशाप्रकारे सीआयडीने नायडूंविरुद्ध चार वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. कौशल्य विकास घोटाळ्यात ते आधीच न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्याविरुद्ध अंगलू प्रकरण आणि अमरावती रिंगरोड प्रकरणातही तपास सुरू आहे.

    दारू परवाना घोटाळा

    चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधातील ताजी केस दारू परवाना घोटाळ्याची आहे. या प्रकरणाची नोंद करून, सीआयडीने सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (एसीबी) न्यायालयात औपचारिकपणे याचिका दाखल केली आणि न्यायालयाने नायडू यांच्यावर कारवाई करण्यासाठी सीआयडीला परवानगी दिली. नायडू राजमुंद्री मध्यवर्ती कारागृहातून सुनावणीत व्हर्च्युअली सामील झाले.

    कौशल्य विकास घोटाळा

    कौशल्य विकास घोटाळ्यात नायडू यांना सीआयडीने 9 सप्टेंबर रोजी अटक केली होती. 73 वर्षीय नायडू यांच्यावर 2015 मध्ये मुख्यमंत्री असताना कौशल्य विकास महामंडळाच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे राज्याच्या तिजोरीचे 371 कोटी रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी नायडू 1 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत.

    CID registers fourth case against Chandrababu Naidu; Accused of distributing licenses to illegal liquor shops

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mumbai soldier : पाकविरोधात लढताना मुंबईचा जवान शहीद; मुरली नाईक यांना उरीमध्ये लढताना वीरमरण

    Neeraj Chopra : आयपीएल नंतर आता ‘ही’ क्रीडा स्पर्धा देखील भारतात झाली स्थगित

    India-Pakistan : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर