वृत्तसंस्था
नवी दिल्ली – लडाखमधल्या अतिउंचीवरील लष्करी तैनातीत चीनच्या सैन्यापुढे अडचणी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. चीनला ९० टक्के सैनिकांचे रोटेशन करावे लागले आहे. म्हणजे त्यांची अदलाबदल करावी लागली आहे. अतिउंचीवरच्या आणि दुर्गम भागातील प्रतिकूल हवामानाचा चीनी सैनिकांना होणारा त्रास सहनशीलतेच्या पलिकडे गेला आहे. त्यामुळेच त्यांना ९० टक्के सैनिकांना परत मूळ ठिकाणी पाठवावे लागले आणि तेवढेच सैनिक नव्याने लडाखमधल्या अतिउंचीवरच्या पोस्टवर तैनात करावे लागले, असे भारतीय सैनिकी सूत्रांनी सांगितले. China rotates 90 per cent troops deployed along Ladakh sector on India border
भारतीय सैनिकांचे देखील रोटेशन होते. म्हणजे सैनिकांच्या तैनातीची अदलाबदल होते. पण ती वर्षभरात ४० ते ५० टक्क्यांच्या दरम्यान असते. संघर्षाच्या प्रसंगी किंवा नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी देखील या टक्केवारी भारतीय बाजूने फारसा फरक पडलेला नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
याचा अर्थ लडाखच्या अतिउंच भागात प्रतिकूल हवामानात काम करण्याची चीनच्या सैनिकांची क्षमता कमी आहे तर भारतीय सैनिकांची क्षमता कितीतरी अधिक आहे. इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्सच्या जवानांची नियुक्ती तर या क्षेत्रात २ वर्षांसाठी असते. अतिउंचीवरच्या लढाईत हे सैनिक माहीर समजले जातात.
लडाखमध्ये गेल्यावर्षी झालेल्या हिंसक संघर्षाच्या वेळी चीनचे ५० हजार सैनिक तेथे तैनात होते. पण आता त्यातले ९० टक्के सैनिक आपापल्या मूळ लष्करी तळांवर परत गेले आहेत. नवे सैनिक तेथे आणण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरात भारतीय सैनिकांनी लडाखमधल्या अतिउंचीवरच्या मोक्याचा ठाण्यांवर कब्जा करून तैनाती वाढविल्याने चीनला हादरा बसला आहे. त्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्य़ा आहेत. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात भारतीय सैनिक यशस्वी ठरले आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
China rotates 90 per cent troops deployed along Ladakh sector on India border
महत्त्वाच्या बातम्या
- दिल्लीच्या रुग्णालयात नर्सना ड्यूटीदरम्यान मल्याळम बोलणावर बंदी, तीव्र निषेधानंतर आदेश मागे
- Corona Updates : कोरोना संसर्गाच्या वेगाला ब्रेक, २ महिन्यांत सर्वात कमी १.१४ लाख नवीन रुग्ण, २४ तासांत २६७७ मृत्यू
- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास, मुंबईतील रुग्णालयात दाखल
- मनी मॅटर्स : खरेदीवेळी संयमाची परिक्षा
- मेहूल चोक्सीच्या अटकेमागील बार्बरा जराबिका आहे तरी कोण? गर्लफ्रेंड की हनीट्रॅप