• Download App
    ‘’प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने आम्हाला धनुष्यबाणही मिळाला आहे आणि...’’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान!Chief Minister Eknath Shindes press conference in Ayodhya

    ‘’प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने आम्हाला धनुष्यबाणही मिळाला आहे आणि…’’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान!

    अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत व्यक्त केल्या भावना, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    अयोध्या :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अयोध्येत शिंदे-फडणवीस सरकारमधील सर्व मंत्री, आमदार व नेत्यांसह प्रभू रामाचं दर्शन घेतलं, महाआरती केली. याशिवाय राम मंदिर निर्माण कार्याचीही पाहणी केली. यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या. Chief Minister Eknath Shindes press conference in Ayodhya

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘’अयोध्या आणि राम मंदिर हा आमच्या आस्थेचा विषय आहे. आमच्या भावना याच्याशी जुडलेल्या आहेत आणि आमची श्रद्धा आणि अस्मिता सुद्धा आहे. दोन, तीन दिवसांपासून हजारोंच्या संख्येनी आमची लोक इथे पोहचत आहेत. काल आम्ही लखनऊत आलो तिथेही वातावरण पाहीलं. हजारोंच्या संख्येने इथे आमचे रामभक्त कार्यकर्ते आहेत. एवढ्या मोठ्यासंख्येने आमच्या स्वागतासाठी ते जमले होते, तुम्ही सर्वांनी हे पाहीलंच आहे. त्यामुळे मी सर्वांचे आभार व्यक्त करू इच्छितो. रॅलीतही हजारोंच्या संख्येने स्थानिक रामभक्त कार्यकर्ते सहभागी झाले होते. पूर्ण वातावरण राममय झालं होतं. याचे साक्षीदार आमच्यासह तुम्हीदेखील आहात.’’


    ‘Project Tiger’चे यश केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अभिमानास्पद – पंतप्रधान मोदी


    याचबरोबर ‘’अयोध्या आमच्यासाठी अतिशय आत्मियतेचा विषय आहे, इथे येण्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा मनात आनंदाची लाट येते. एक समाधान आणि एक वेगळीच भावना निर्माण होते. कारण, तिथलं वातावरणच काहीसं तसं आहे. प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. परंतु ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सर्वांना राम मंदिर हे स्वप्नच वाटत होतं. सर्व हिंदूना, आमचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना, देशातील तमाम हिंदुत्ववादी विचारांचे रामभक्त सर्वांचंच स्वप्न होतं. अयोध्येतील राम मंदिर हे हिंदुत्वाचे प्रतिक आहे, अस्मिता आहे. जगभरातील हिंदू बांधव-भगिनी या ठिकाणी नक्कीच येतात. सर्वांची एकच इच्छा होती, स्वप्न होते की या ठिकाणी राम मंदिर उभारावं आणि आता आपण राम मंदिर निर्माणचं काम पाहत आहोत. एवढ्या झपाट्याने काम होईल, हा कुणीच विचार करू शकत नव्हतं. परंतु आता राम मंदिर पूर्णत्वास येत आहे. खरंतर सर्वांना हे स्वप्नवत वाटत होतं, असं असताना या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हे काम सुरू झालं आणि पुढे पुढे जात आहे आणि जानेवारी २०२४ मध्ये मूर्ती स्थापनाही होणार आहे.’’ असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

    याशिवाय, ‘’आम्हाला प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने धनुष्यबाणही मिळाला आहे आणि पक्षाचं नावही मिळालं आहे. मुख्यमंत्री बनल्यानंतर पहिल्यांदाच मी माझ्या सर्व सहाकऱ्यांसह रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे. आजचा दिवस माझ्या आय़ुष्यातील सर्वात भाग्याचा दिवस आहे. आजचं दर्शन, ही यात्रा मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. या अगोदरही मी यायचो नियोजन करायला यायचो. परंतु आज आमच्या कार्यकर्त्यांनी या यात्रेचं अतिशय उत्तम नियोजन केलं आहे, ज्यामुळे संपूर्ण वातावरण भगवामय झालं आहे.’’ असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या.

    Chief Minister Eknath Shindes press conference in Ayodhya

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!