• Download App
    CM Eknath Shinde Ayodhya Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिल रोजी अयोध्येला जाणार; आमदार, खासदारांसह घेणार प्रभू रामाचं दर्शन! Chief Minister Eknath Shinde will visit Ayodhya on April 9

    CM Eknath Shinde Ayodhya Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिल रोजी अयोध्येला जाणार; आमदार, खासदारांसह घेणार प्रभू रामाचं दर्शन!

    ”अयोध्या आमच्यासाठी भावना श्रद्धेचा विषय आहे, याकडे आम्ही राजकारण म्हणून बघत नाही.”, असंही मुख्यमंत्री शिदेंनी सांगितलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

     मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे. येत्या 9 एप्रिल रोजी ते अयोध्येला जाणार आहेत. यावेळी ते पक्षाच्या आमदार, खासदार व नेत्यांसह रामल्लाचे दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: याबाब माहिती जाहीर केली आहे.  Chief Minister Eknath Shinde will visit Ayodhya on April 9

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, अयोध्येतील राम मंदिराचे बाळासाहेबांचे स्वप्न होते, ते पंतप्रधान मोदी पूर्ण करत आहेत. यामध्ये खारीचा वाटा म्हणून आम्ही सागाची लाकडे मंदिरासाठी पाठवली आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांनी त्यावेळी चांदीची वीट पाठवली होती. त्यामुळे अयोध्या आम्हाला श्रद्धेचा विषय आहे.

    शिवसेन पक्षाचे आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांसह अयोध्या दौरा होणार असून, मंदिर निर्माणाधीन भागातही आम्ही भेट देणार आहोत. शरयू नदीवर आरती करणार आहोत. आम्ही या विषयाकडे राजकारण म्हणून पाहिलं नाही आणि पाहणार सुद्धा नाही.

    Chief Minister Eknath Shinde will visit Ayodhya on April 9

    Related posts

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो