वृत्तसंस्था
बंगळूर : कर्नाटक राज्यात कोरोनाचे संकट गंभीर होत आहे. सर्वच शहरांमध्ये कोरोनाचे संक्रमण होत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात नाईट कर्फ्यू लागू (रात्री 9 ते सकाळी 5) करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळेत कलम 144 लागू राहील. तसेच बेळगावसह अनेक सीमावर्ती भागात विकेंड लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज केली. Chief Minister Basavaraj Bommai announces Night curfew in Karnataka, weekend lockdown in border areas including Belgaum
बेळगाव, बिदर, गुलबर्गा, म्हैसूर, चामराजनगर, दक्षिण कन्नड, कोडगू आणि विजापूर जिल्ह्यात शनिवार आणि रविवार वीकेंड लॉकडाऊन लागू केला आहे. राज्यातील अनेक शहरातील परिस्थिती कोरोनामुळे बिघडत आहे. रुग्णांची संख्या वाढत चालले आहे. त्यामुळे जिल्हा व महापालिका प्रशासन सावध झाले आहे.
राज्यात रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. शनिवारी आणि रविवारी विविध व्यवहार आणि कामकाजावर निर्बंध लादले जाणार आहेत. पण, त्याचे स्वरुप काय असणार आहे, हे अजून स्पष्ट नाही. याबाबतचा आदेश राज्य सरकारतर्फे काढला जाणार आहे.
- कर्नाटकात RT-PCR असेल तरच प्रवेश
- 72 तासाच्या आतील कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट हवा
- केरळ, महाराष्ट्रतून संसर्ग टाळण्याची खबरदारी
- कोरोनाचे रुग्ण वाढल्यास जिल्ह्यातील अधिकारी जबाबदार
- सीमेवर काटेकोर तपासणी केली जात आहे.
- लस घेतली तरी सर्वांनाच 72 तासांमधील कोरोना निगेटिव्ह अहवाल सक्तीचा
Chief Minister Basavaraj Bommai announces Night curfew in Karnataka, weekend lockdown in border areas including Belgaum
महत्त्वाच्या बातम्या
- US green card : या वर्षी एक लाख यूएस ग्रीन कार्ड नाकारण्याची शक्यता, भारतीय प्रोफेशनल्समध्ये नाराजी
- Digital India : तब्बल ८२ कोटी भारतीयांकडून इंटरनेटचा वापर; १,५७,३८३ ग्रामपंचायतींमध्ये हायस्पीड ब्रॉडबँड
- पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा, राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून आता असेल मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार
- संतापजनक : क्रेडिट कार्डचं बिल थकल्याने औरंगाबादेत महिलेकडे सेक्सची मागणी, पोलिसांकडून कारवाईऐवजी तक्रारदारालाच त्रास