विशेष प्रतिनिधी
अहमदनगर: नगरचा माजी उपमहापौर आणि नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमधील आवाज छिंदम याचाच असल्याचा फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात स्पष्ट झाले आहे.Chhindam used foul language about Shivaji Maharaj, as evidenced by the forensic lab report
तपास अधिकारी तोफखाना पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक किरण सुरसे यांनी हे साठ पानांचे दोषारोपपत्र सोमवारी नगरच्या न्यायालयात दाखल केले. फेब्रुवारी २०१८ मध्ये हा गुन्हा घडला होता. गुन्हा घडला तेव्हा छिंदम उपमहापौरपदावर होता.
त्यामुळे त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी गृहविभागाची परवानगी हवी असते. ती मिळविण्याची प्रदीर्घ प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. त्यानंतर लगेचच हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
हा गुन्हा ऑडिओ क्लिपवर आधारित आहे. बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना छिंदम याने शिवरायांबद्दल अपशब्द उच्चारले होते. छिंदम उपमहापौर असल्याने त्यांनी बिडवे यांना फोन करून एक काम सांगितले.
मात्र, त्यावेळी शिवजयंती जवळ आली होती. त्यामुळे महापालिकेची संबंधित यंत्रणा त्या तयारीत असून ते काम झाले की, तुमचे करतो, असे बिडवे फोनवर छिंदमला सांगत होते. त्या दरम्यान छिंदम याने एकदम संतापून शिवरायांबद्दल गलिच्छ भाषा वापरली. बिडवे यांनाही शिवीगाळ केली.
ही ऑडिओ क्लिप नंतर व्हायरल झाली. याप्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून हा गुन्हा दाखल झालेला आहे. या क्लिपचा वापर मुख्य पुरावा म्हणून होणार आहे.
पोलिसांनी तपासात ही क्लिप आणि छिंदम याच्या आवाजाचे नमुने घेऊन फॉरेन्सिक लॅबला पाठविले होते. त्याचा अहवालही मिळाला असून तो पुरावा पोलिसांनी दोषारोपपत्रासोबत जोडला आहे. याशिवाय अन्य सहा साक्षीदारांचे जबाबही नोंदविण्यात आले आहेत.
Chhindam used foul language about Shivaji Maharaj, as evidenced by the forensic lab report
महत्त्वाच्या बातम्या
- इंडोनेशियात कोरोनाचा हाहाकार : भारत आणि ब्राझीलला मागे सोडून इंडोनेशिया बनला कोरोना महामारीचा नवा हॉटस्पॉट
- Free Vaccine For Everyone : 24 दिवसांत लसीकरणाचा आकडा 30 वरून 40 कोटींवर, आरोग्यमंत्री मंडाविया यांचे ट्विट
- Pegasus Spying : आयटी मंत्री अश्विनी वैष्णव लोकसभेत म्हणाले- लीक झालेल्या डेटाचा हेरगिरीशी संबंध नाही, आरोप निराधार!
- कळव्यात दरड कोसळून 5 जण ठार, ढिगाऱ्याखालून 2 जणांची सुटका, रेस्क्यू ऑपरेशन सुरू
- पाकिस्तानी षडयंत्राचा पर्दाफाश : जिथे भारतीय पत्रकार दानिशची हत्या झाली, तेथे पाकिस्तान आणि तालिबानचे झेंडे एकत्र फडकतात