आज सकाळी ६.४५ वाजता सुरक्षा दल मर्जुमच्या टेकडीजवळ पोहोचले तेव्हा नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला Chhattisgarh: 40 Naxalites gathered in the hills of Marjum village, clash between Naxalites and security forces; A Naxalite killed
विशेष प्रतिनिधी
छत्तीसगड : छत्तीसगडमधील जिल्ह्यातील टोंगपाल पोलीस स्टेशन हद्दीतील मर्जुम गावातील डोंगराळ भागात मंगळवारी नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली.दरम्यान या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला.
या कारवाईत सुरक्षा दलाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.पोलिसांनी सांगितले की,जिल्ह्यातील टोंगपाल पोलीस स्टेशन हद्दीतील मर्जुम गावातील डोंगराळ भागात ही घटना घडली.
सुकमा, दंतेवाडा आणि बस्तर जिल्ह्यांच्या सीमेला लागून असलेल्या भागातसुमारे ४० नक्षलवादी जमल्याची माहिती मिळाली होती.दरम्यान नक्षलवादी कारवायांची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांना नक्षलविरोधी अभियानात पाठवण्यात आले.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आज सकाळी ६.४५ वाजता सुरक्षा दल मर्जुमच्या टेकडीजवळ पोहोचले तेव्हा नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला.दरम्यान या गोळीबाराला देखील सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले की, सुरक्षा दलांनी आतापर्यंत एका नक्षलवाद्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे, नक्षलवादी अजूनही टेकडीवरून गोळीबार करत आहेत.या संदर्भात अधिक माहितीची प्रतीक्षा असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
Chhattisgarh: 40 Naxalites gathered in the hills of Marjum village, clash between Naxalites and security forces; A Naxalite killed
महत्त्वाच्या बातम्या
- “अमरावतीवरून पोरं निघाले आहेत पंजा सांभाळून ठेव” – माजी कृषि मंत्री अनिल बोंडे
- भल्या पहाटे ‘भुजबळ फार्म’ बाहेर निषेधाची काळी रांगोळी , पोलीस बंदोबस्तात केली वाढ
- पुण्यात भाजपचे नाना पटोलेंविरोधात पोस्टर लावत खुलं आव्हान
- मुख्यमंत्री चन्नी यांच्या कुटुंबीयांवर ईडीने मारली धाड, पंजाबमधील राजकीय वातावरण झाले गरम