• Download App
    Chhatrapati Sambhaji Nagarऔरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर अन् उस्मानाबादचे धाराशिव होणार

    Chhatrapati Sambhaji Nagar :औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर अन् उस्मानाबादचे धाराशिव होणार; सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब!

    Chhatrapati Sambhaji Nagar

    महाराष्ट्र सरकारच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात फेटाळली


    विशेष प्रतिनिधी

    राज्यातील दोन शहरांची नावे बदलण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (2 ऑगस्ट) हिरवी झेंडी दिली. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून औरंगाबादचे (Aurangabads )नाव बदलून छत्रपती संभाजी नगर  ( Chhatrapati Sambhaji Nagar )आणि उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळली.



    वास्तविक, याचिकाकर्त्यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. ज्यामध्ये राज्य सरकारच्या निर्णयाला कोणतेही कायदेशीर आव्हान न दिसल्याने आणि तो कायम ठेवला होता. यानंतर याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आपल्या बाजूने येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मात्र, तसे झाले नाही न्यायालयाने याचिका फेटाळून महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला हिरवी झेंडी दिली.

    नाव बदलणे हा सरकारचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यासाठी न्यायालयीन पुनरावलोकनाची गरज नाही. तुमचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच हायकोर्टाने सविस्तर आदेश दिले आहेत. त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. यापूर्वी ८ मे रोजी उच्च न्यायालयाने औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्याचा राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवला होता. हा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. आता सर्वोच्च न्यायालयानेही त्यास मान्यता दिली आहे.

    Chhatrapati Sambhaji Nagar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!