• Download App
    chatrapati Shivaji maharaj was the first king to build a navy; Amit Shah; Bhumi Pujan of the statue of Shivaji Maharaj

    नौदल उभारण्याचा पहिला मान शिवरायांनाच; अमित शाह यांचे गौरवोद्गार; शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन

    वृत्तसंस्था

    पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांनी न्याय, समाजकल्याण आणि स्वसंरक्षणासाठी डावपेच आखले. केवळ सैन्यच उभारले नाही तर सैन्याचे आधुनिकीकरण सुद्धा केले. तसेच पहिले नौदल उभारण्याचा मान हा शिवाजी महाराजांनाच जातो, असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले. Chatrapati Shivaji maharaj was the first king to build a navy; Amit Shah; Bhumi Pujan of the statue of Shivaji Maharaj

    रविवारी पुणे महापालिकेला शाह यांनी भेट दिली. या वेळी महापालिकेच्या प्रांगणातील हिरवळीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन शहा यांच्या हस्ते झाले. महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी बसविलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरणही त्यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते.



     

    हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांनी देशाला दिशा दिलेली आहे. दैनंदिन जीवनात काम करत असताना या दोन्ही महापुरुषांच्या वाटेवरून वाटचाल करणे, हे प्रेरणादायी आहे. म्हणूनच महापालिका म्हणून पुणेकरांसाठी काम करत असताना या दोन्ही महापुरुषांचे पुतळे असावेत, ही मनोमन इच्छा होती. जी आता पूर्णत्वास जात असताना मनस्वी समाधान आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

    chatrapati Shivaji maharaj was the first king to build a navy; Amit Shah; Bhumi Pujan of the statue of Shivaji Maharaj

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Kolkata High Court : कोलकाता उच्च न्यायालयाचे खंडपीठ आरजी-कर प्रकरणाच्या सुनावणीतून बाजूला झाले; म्हटले – वेळ देऊ शकत नाही

    Udayanidhi Stalin : उदयनिधी स्टॅलिन म्हणाले- सनातन धर्म संपवला पाहिजे; हे लोकांना विभाजित करते; पूर्वी डेंग्यू, मलेरिया म्हणाल्याने सर्वोच्च न्यायालयाने फटकारले होते

    Dattatreya Hosabale : RSS महासचिव म्हणाले- पाकशी चर्चा, बंद व्हिसा सेवा सुरू ठेवावी; क्रीडा-व्यापारही सुरू राहिला पाहिजे; मात्र पुलवामासारख्या कृत्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल