विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जुन्या वाहनांना बीआयएस मानांकन मिळावे. ज्यामुळे नवे वाहन खरेदी करण्याची गरज पडणार नाही, अशी विचारणा भाजपाच्या खासदार व अभिनेत्री रूपा गांगुली यांनी केली. यावर त्यांना विनोदीशैलीत उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, हे शक्य नाही Character actress does not become heroine, Nitin Gadkari’s reply to Rupa Ganguly
जसे एकदा चरित्र अभिनेत्रीचे काम सुरू केलेल्या अभिनेत्रीला हिरोईनचे काम मिळत नाही.लोकसभेत झालेल्या चर्चेच्या वेळी गडकरी यांच्या या वक्तव्याने दोन्ही बाजुंचे सदस्य हास्यात सामील झाले. दुसºया एका पूरक प्रश्नाला उत्तर दिल्यानंतर गडकरी यांनी हे वक्तव्य कुणी मनाला लावून घेऊ नये, अशी विनंती केली.
रुपा गांगुली म्हणाल्या, नव्य गाड्यांमध्ये सुरक्षेसाठी आलेली फिचर्स खूप चांगली आहेत. मात्र, ज्या गाड्या दोन-तीन वर्षांपूर्वी घेण्यात आल्या आहेत त्या तशा नव्याच आहेत. त्यांना नवीन फिचर्स लावणे शक्य नाही का? यावर गडकरी यांनी हे उत्तर दिले. गडकरी म्हणाले, देशात दरवर्षी सुमारे पाच लाख वाहन अपघात होतात.
त्यामध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे वाहनांना सुरक्षेची मानके लावणे आवश्यक आहे. आता येथून पुढे येणाºया प्रत्येक नवीन गाडीला सहा एअरबॅग असणार आहेत.वाहन चालक व इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. युरोपीय देशांमध्ये वाहनांच्या सुरक्षेसाठी असलेले निकष इलेक्ट्रिक वाहनांनाही लागू आहे. यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
Character actress does not become heroine, Nitin Gadkari’s reply to Rupa Ganguly
महत्त्वाच्या बातम्या
- महत्त्वाची बातमी : लोकसेवा आयोगाच्या इच्छुक परीक्षार्थी उमेदवारांसाठी वयोमर्यादेत शिथिलता नाही, संधीही वाढणार नाहीत
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : केंद्रापाठोपाठ राज्याकडूनही महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ, १७ लाख कर्मचाऱ्यांना लाभ
- युती सरकार असताना सारे आलबेल होते? ; नाना पटोले यांचा प्रश्न
- एनसीबीने टाकलेल्या छाप्यात कोट्यवधींचे अंमली पदार्थ जप्त – पुण्यात मंगळवारी रात्री उशिरा केली होती गोपनीय कारवाई