विशेष प्रतिनिधी
चंदीगड : पंजाबमध्ये मतदानाची तारीख वाढवण्यात आली आहे. आता २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सोमवारी सकाळी निवडणूक आयोगाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. Change in voting date for Punjab Poll will be on 20 february, instead 14
खरे तर पंजाबमध्ये यापूर्वी १४ फेब्रुवारीला मतदान होणार होते तर गुरु रविदास जयंती १६ फेब्रुवारीला आहे. पंजाबमधील एससी समुदायातील लोक गुरु रविदास जयंतीला वाराणसीला जातात. त्यामुळेच मतदान पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. आता पंजाब निवडणुकीची अधिसूचना २५ जानेवारीला जारी होणार आहे. १ फेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशनपत्रे भरण्यात येणार आहेत. ४ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांची अंतिम यादी तयार केली जाईल.
यापूर्वी मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी निवडणूक आयोगाकडे पंजाबमधील मतदान सहा दिवस पुढे ढकलण्याची मागणी केली होती. यानंतर भारतीय जनता पक्ष आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही रविवारी निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदान पुढे ढकलण्याची मागणी केली होती. १६ फेब्रुवारीला गुरु रविदास जयंतीच्या पवित्र सणामुळे राज्यातील मोठा वर्ग वाराणसीला जाऊ शकतो, असे भाजपने पत्रात लिहिले आहे. अशा स्थितीत राज्यात मतदान झाले तर ते लोक मतदानाच्या हक्कापासून वंचित राहतील. अशा स्थितीत भाजपने पंजाब निवडणूक आयोगाकडे राज्यात १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाची मुदत काही दिवसांनी वाढवण्याची मागणी केली.
१६ फेब्रुवारी रोजी, गुरु रविदासजींची ६५४ वी जयंती
पंजाबमध्ये ३२ टक्के अनुसूचित जातीचे लोक राहतात. १६ फेब्रुवारी हा श्रीगुरु रविदासजींची ६४५ वी जयंती आहे. अशा परिस्थितीत लाखो लोक त्यांच्या जन्मगावी गोवर्धनपूरला भेट देतात. हे ठिकाण उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये आहे. १३ ते १४ फेब्रुवारी दरम्यान लोक विशेष गाड्यांमधून सुटतील.
Change in voting date for Punjab Poll will be on 20 february, instead 14
महत्त्वाच्या बातम्या
- PM Security Breach : शीख फॉर जस्टिसकडून पंतप्रधानांचा ताफा पुन्हा रोखण्याची धमकी, वकिलांना फोन, चौकशी समितीला काम न करण्याचा इशारा
- पाकिस्तानची शास्त्रज्ञ आफिया सिद्दिकीच्या सुटकेची मागणी, सुरक्षेसाठी अमेरिकेत ४ जणांना ठेवले ओलीस ; कोण आहे ही आफिया सिद्दीकी?
- Punjab Election Date Changed : पंजाबमध्ये निवडणुकीची तारीख बदलली, आता या दिवशी होणार मतदान