विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिनांक १४ जुलै रोजी ट्विटर (X) वर पोस्ट झालेल्या एका व्हिडिओनंतर, मध्य रेल्वेने धोकादायक स्टंट्स करण्याविरूद्ध कठोर इशारा जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण मुलगा चालत्या ट्रेनमध्ये चढताना धोकादायक स्टंट करत असल्याचे दाखवले आहे. यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करण्यासाठी आवश्यक पावले उचलली. वडाळा रोड येथील रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) चौकीने फुटेजमध्ये दिसणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले होते. Central Railway has identified the stunt performer from this viral video, who later lost an arm and leg during another stunt.
अखेर आरपीएफला त्या व्यक्तीचा त्याच्या घरीच शोध घेण्यात यश आले, ज्याचे नाव फरहत आझम शेख असून तो अँटॉप हिल, वडाळा येथील रहिवासी आहे. व्हिडिओमधील घटनेची चौकशी केल्यावर त्याने सांगितले की, त्याने दि. ७ मार्च रोजी शिवडी स्टेशन येथे छञपती शिवजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये स्टंट करण्याचे बेकायदेशीर कृत्य केले होते. त्याने पुढे खुलासा केला की, त्याला लाइक्स मिळविण्यासाठी सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी मित्राने हे अवैध कृत्य रेकॉर्ड केले होते.
दि. १४ एप्रिल रोजी फरहतला मस्जिद स्टेशनवर वेगळा स्टंट करताना जीवघेणा अपघात झाला आणि त्यात त्याने डावा हात आणि पाय गमावला. रेल्वे प्रशासनाने त्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्याला दैनंदिन कामे करण्यात अत्यंत अडचणी येत आहेत. त्यांने एका व्हिडिओमध्ये सर्व प्रवाशांना अशा धोकादायक कृत्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करताना म्हटले आहे की, असे स्टंट्स केवळ बेकायदेशीरच नाही तर जीवघेणे देखील आहेत.
मध्य रेल्वेने सर्वांना विनंती केली आहे की, स्टंट करणाऱ्या व्यक्ती आणि इतर प्रवाशांसाठी जीवघेणे ठरू शकणाऱ्या अशा जीवघेण्या स्टंट्स/ कृत्यापासून दूर रहावे.
रेल्वेने असेही आवाहन केले आहे की, कोणीही ट्रेन किंवा प्लॅटफॉर्मवर स्टंटबाजी करत असल्यास मोबाईल क्रमांक ९००४४१०७३५ किंवा १३९ वर त्वरित संपर्क साधून तक्रार करावी.
Central Railway has identified the stunt performer from this viral video, who later lost an arm and leg during another stunt.
महत्वाच्या बातम्या
- BCCI सचिव जय शहा यांची घोषणा; ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना 8.5 कोटींची मदत, 117 भारतीय खेळाडू सहभागी होणार
- Pushkar Singh Dhami : अग्निवीरांसाठी पुष्कर सिंह धामी सरकारने केली मोठी घोषणा
- US Elections : बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यावर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया
- एकीकडे जरांगेंची अमित शाहांवर जहरी टीका; तर दुसरीकडे पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!!