विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताचे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर भारताने आपली भूमिका अधिक ताठर करत कुठल्याही प्रकारच्या दहशतवादाला act of war असे समजूनच ठोकून काढले जाईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याचे जाहीर केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रू नंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबीओ आणि त्यानंतर पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी शस्त्रसंधी संदर्भात ट्विट केले.
अमेरिकेने दोन्ही देशांच्या नेत्यांशी सुमारे 48 तास मध्यस्थीची चर्चा केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्रसंधी करायची तयारी दाखवली दोन्ही देशांनी प्रगल्भता दाखवली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, असे ट्रू डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. त्यानंतर मार्को रुबियो यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचे तपशीलवार वर्णन केले. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्याशी चर्चा केली.
मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधी करायची तयारी दाखविली, असे ट्विट मार्को रुबियो यांनी केले.
दोन्ही देशांनी चर्चेची तयारी दाखविली असून त्रयस्थ ठिकाणी ही चर्चा होईल असा दावा देखील मार्को रुबियो यांनी केला.
Ceasefire between India and Pakistan after India changes policy, claims Donald Trump
महत्वाच्या बातम्या
- Colonel Sophia कर्नल सोफिया म्हणाल्या- पाकिस्तान नागरिकांचा ढाल म्हणून वापर करतोय; 400 ड्रोन उडवले
- BCCI : भारत-पाकिस्तान तणावामुळे IPL-2025 स्थगित; BCCI ने घेतला मोठा निर्णय
- Operation sindoor : तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची “ढाल”; भारताने प्रेस ब्रीफिंग मध्ये वाचली पाकिस्तानची पापे, पण वाचा जे सांगितले नाही ते!!
- Nishikant Dubey : सुप्रीम कोर्टाने म्हटले- निशीकांत दुबे यांचे विधान बेजबाबदार; आम्ही फुले नाही जी अशा विधानांनी कोमेजतील