• Download App
    पंतप्रधान मोदींच्या कानपूरमधील सभेत दंगलीचा कट, सीसीटीव्हीमुळे उघड, समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अटक । CCTV reveals conspiracy to riot at PM Modi's Kanpur rally, Samajwadi Party official arrested

    पंतप्रधान मोदींच्या कानपूरमधील सभेत दंगलीचा कट, सीसीटीव्हीमुळे उघड, समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अटक

    पीएम मोदींच्या कानपूरच्या सभेत दंगल घडवण्याचा कट रचल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि व्हिडिओ फुटेजच्या आधारे समाजवादी पक्षाच्या एका कार्यकर्त्याला अटक केली आहे. CCTV reveals conspiracy to riot at PM Modi’s Kanpur rally, Samajwadi Party official arrested


    वृत्तसंस्था

    लखनऊ : पीएम मोदींच्या कानपूरच्या सभेत दंगल घडवण्याचा कट रचल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि व्हिडिओ फुटेजच्या आधारे समाजवादी पक्षाच्या एका कार्यकर्त्याला अटक केली आहे. एक कारही जप्त करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या रॅलीपूर्वी कानपूरच्या नौबस्तामध्ये अल्टो कारची तोडफोड करण्यात आली आणि पुतळ्याचे दहन करण्यात आले. रॅलीपूर्वी तोडफोड आणि जाळपोळीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कलम 147, 148, 153-अ, 336, 427, 435, 341, 34, 500 505 (2) अन्वये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    एफआयआरमध्ये असे लिहिले आहे की, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये समाजवादी पक्षाच्या 8 ते 10 कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या पांढऱ्या कारवर दगडफेक केल्याचे दिसून येते. पंतप्रधानांच्या पुतळ्याचे दहन करून जाळपोळ करण्यात आली. व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. चौकशीदरम्यान असे आढळून आले की, 8 ते 10 मुलांनी (ज्यांनी लाल टोप्या घातल्या होत्या) मोदीजींचा पुतळा जाळला आणि पांढऱ्या रंगाच्या अल्टो कारवर दगडफेक केली. अनेकवेळा मुख्य रस्ता अडवून घोषणाबाजी करण्यात आली, त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर संकट आले.



    भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) कानपूरच्या 54 व्या दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी आणि कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी कानपूरला गेले होते. रेल्वे ग्राउंड, निराला नगर, कानपूर नगर येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी 11 हजार कोटी रुपये खर्चाच्या कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले होते.

    CCTV reveals conspiracy to riot at PM Modi’s Kanpur rally, Samajwadi Party official arrested

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!