• Download App
    इस्त्रायली दूतावासासमोरील स्फोटातील दोन संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज एनआयएकडून जारी; तपासातून ठोस माहिती हाती येण्याची शक्यता CCTV footage of suspects in a blast that took place on January 29th outside the Israel Embassy in Delhi

    इस्त्रायली दूतावासासमोरील स्फोटातील दोन संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज एनआयएकडून जारी; तपासातून ठोस माहिती हाती येण्याची शक्यता

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – राजधानीतील ल्यूटन्स भागात इस्त्रायली दूतावासासमोर २९ जानेवारी २०२० रोजी झालेल्या स्फोटातील संशयितांचे सीसीटीव्ही फूटेज राष्ट्रीय तपास संस्था अर्थान एनआयएने जारी केले आहे. CCTV footage of suspects in a blast that took place on January 29th outside the Israel Embassy in Delhi

    दोन संशयित युवक या दूतावासानजीक फिरताना या  सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत. यापैकी एकाने निळा फुल शर्ट आणि निळी जीन्स घातलेली आहे तर दुसऱ्याने काळे जर्किन आणि काळी पँट घातलेली दिसत आहे. दोघांच्या तोंडावर मास्क असून काळे जर्किन आणि पँट घातलेल्या संशयित युवकाच्या खांद्याला एक मोठी बॅग अडकवलेली दिसते आहे. ५८ सेकंदांचे हे सीसीटीव्ही फुटेज असून दोघेही संशयास्पद रितीने या परिसरात फिरताना आढळत आहेत. ते दोघेही ऑटो रिक्षा थांबविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण ऑटो थांबत नसल्याचे पाहून त्यांनी रस्ता ओलांडून ते पुढे आल्याचेही दिसत आहे.

    एनआयएने जारी केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून काही खुलासे होतील, अशी तपाससंस्थेला अपेक्षा आहे.

    ल्यूटन्स दिल्लीत इस्त्रायली दूतावासासमोर २९ जानेवारी २०२० रोजी स्फोट घडविण्यात आला होता. यामध्ये जीवितहानी झालेली नव्हती. पण ही तर सुरूवात आहे, अशी धमकी देणारे विडिओ दहशतवादी संघटनांनी नंतर जारी केले होते. या स्फोटाचा प्राथमिक तपास दिल्ली पोलीसांनी केल्यानंतर तो एनआयएकडे सोपविण्यात आला होता. दिल्ली पोलीसांनी त्यावेळेला काही सीसीटीव्ही फुटेज तपासली होती. पण त्यातून तपासात फारशी प्रगती झालेली नव्हती.

    आता एनआयएने वेगळे सीसीटीव्ही फुटेज मिळवून ते जारी केले आहे. ते संशयितांचे फुटेज आहे, असे एनआयएने स्पष्ट केले आहे. या फुटेजमुळे संशयित सापडण्यास आणि स्फोटाच्या मूळापर्यंत जाण्यास मदत होईल, अशी एनआयएची अपेक्षा आहे.

    CCTV footage of suspects in a blast that took place on January 29th outside the Israel Embassy in Delhi

    Related posts

    India-US : द फोकस एक्सप्लेनर : भारत-अमेरिका व्यापारी फ्रेमवर्क: “Zero Tariff” म्हणजे काय आणि त्याचा सर्वसामान्यांवर काय अर्थ?

    Malegaon : मालेगावमध्ये इस्लाम पक्षाच्या नसरीन महापौर झाल्या, सपा उपमहापौरपदी

    Tragedy in Kota : कोटामध्ये 3 मजली इमारत कोसळली, अनेक जण दबले; रेस्टॉरंटमध्ये ग्राहक आणि कर्मचारी होते