• Download App
    CBSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; पंतप्रधानांसमवेत बैठकीनंतर निर्णय CBSE Board Exams for Class 10th cancelled & 12th postponed.

    CBSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; पंतप्रधानांसमवेत बैठकीनंतर निर्णय

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – केंद्र सरकारने सीबीएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. वाढत्या कोरोनाच्या फैलावामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. CBSE Board Exams for Class 10th cancelled & 12th postponed.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर शिक्षण मंत्रालयाने हा निर्णय जाहीर केला. दहावीच्या परीक्षांचा निकाल हा सीबीएससी बोर्डाने तयार केलेल्या ऑब्जेटिव्ह निकषांनुसार लावण्यात येईल आणि योग्य वेळी तो जाहीर करण्यात येईल.

    बारावीची परीक्षा पुढे ढकलली असून तिची पुढील तारखा कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन नंतर जाहीर करण्यात येईल, असेही शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

    या आधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी सीबीएससी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले होते. अखेर हा निर्णय सरकारने जाहीर केला आहे.

    CBSE Board Exams for Class 10th cancelled & 12th postponed.

    Related posts

    Modi : मोदी म्हणाले- पाटणा पुण्यासारखे, मोतीहारी मुंबईसारखी होईल; गयाजीमध्ये गुरुग्रामसारखे रोजगार मिळतील

    Bhupesh Baghel :दारू घोटाळ्यात माजी सीएम भूपेश बघेल यांच्या मुलाला अटक

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- NIA खटल्यांच्या सुनावणीसाठी स्पेशल कोर्ट असावे, अन्यथा अंडरट्रायल आरोपींना जामीन द्यावा लागेल!