CBSE Board Exam 2021 : देशभरात कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी शिक्षण मंत्रालयासोबत घेतलेल्या बैठकीनंतर सीबीएसई 12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, तर 10वीच्या परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. CBSE Board Exam 2021: CBSE 12th exam postponed, 10th exam cancelled
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशभरात कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी शिक्षण मंत्रालयासोबत घेतलेल्या बैठकीनंतर सीबीएसई 12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, तर 10वीच्या परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सीबीएसई परीक्षा रद्द करण्याच्या किंवा पुढे ढकलण्याच्या मागण्या लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी आज शिक्षण मंत्रालयाशी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीतील निर्णयानंतरच शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी परीक्षा न घेण्याचे जाहीर केले. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांनी सीबीएसई परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती.
दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वीच प्रसिद्ध झाले आहे. बोर्ड परीक्षा 4 मेपासून सुरू होऊन १० जूनपर्यंत चालणार होती. त्याचबरोबर दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे निकाल 15 जुलैपर्यंत घोषित करण्यात येणार होते. सीबीएसईच्या या बोर्ड परीक्षा 4 मेपासून सुरू होणार होत्या. परंतु आता 10वीची परीक्षाच पूर्णपणे रद्द, तर 12वीची परीक्षा पुढील परिस्थितीवर निर्णय घेईपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
CBSE Board Exam 2021: CBSE 12th exam postponed, 10th exam cancelled
महत्त्वाच्या बातम्या
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख सीबीआय कार्यालयात दाखल, परमबीर सिंगांच्या आरोपांवरून चौकशी सुरू
- गुजरातमध्ये कोरोना रोखण्यासाठी चक्क यज्ञ ; सरकारी रुग्णालय, स्मशानभूमीत उपक्रम
- मुस्लिम महिलांना ‘रिव्हर्स तलाक’चे स्वातंत्र्य, हायकोर्टाने सुनावला महत्त्वाचा निर्णय
- महाराष्ट्रासाठी राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केल्या ५ मागण्या
- सुरतमध्ये कोरोनाचे थैमान, दररोज १०० हून अधिक अंत्यसंस्कार, विद्युतदाहिन्यांची धुरांडीही वितळली