”…अन्यथा ममता आणि त्यांचे लोक सर्व पुरावे नष्ट करतील.” असंही सुवेंदू अधिकारी म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
कोलकाता: पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील टीएमसी सरकारवर जोरदार टीका केली आणि शारदा घोटाळा प्रकरणी केंद्रीय यंत्रणांनी मुख्यमंत्र्यांची चौकशी करावी अशी मागणी केली. CBI should probe Chief Minister Mamata Banerjee in Saradha scam case Shubhendu Adhikari
केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना पाठवलेल्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना, सुवेंदू अधिकारींनी यंत्रणेच्या कारवाईला “तत्काळ” आणि “प्रोएक्टिव्ह” म्हटले. सीबीआयने मंगळवारी अभिषेक बॅनर्जी यांना राज्यातील शिक्षक भरती घोटाळ्याच्या संदर्भात एजन्सीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.
याचबरोबर एएनआयशी बोलताना भाजपा नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले, ”राज्य सरकारकडून इतके असहकार्य असूनही सीबीआय खूप चांगले आणि सक्रिय काम करत आहे. तृणमूल काँग्रेसचे आमदार जीवन कृष्णा साहा यांनी अधिकाऱ्यांचा फोन हिसकावून घेत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सीबीआयची कारवाई योग्य असून ती सुरूच राहिली पाहिजे, अन्यथा ममता आणि त्यांचे लोक सर्व पुरावे नष्ट करतील.”
कथित शारदा घोटाळ्यासंदर्भात केंद्रीय यंत्रणांनी ममता बॅनर्जींची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. ”अभिषेक बॅनर्जी यांच्यावर अनेक खटले सुरू आहेत. मी फक्त केंद्रीय संस्थांकडून बुवा-भतीजा (ममता आणि अभिषेक बॅनर्जी) यांच्यावर कारवाईची मागणी करतो. शारदा घोटाळ्यात ममताची चौकशी करण्यासाठी सीबीआयकडे पुरेसे पुरावे आहेत. जर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अबकारी धोरणाबाबत प्रश्न विचारले जाऊ शकतात तर ममता यांना का नाही?”
टीएमसी नेते मुकुल रॉय भाजपामध्ये सामील झाल्याच्या चर्चांबद्दल विचारले असता, सुवेंदू अधिकारींनी स्पष्टपणे सांगितले की पक्षाला “अशा लोकांची” आवश्यकता नाही.
CBI should probe Chief Minister Mamata Banerjee in Saradha scam case Shubhendu Adhikari
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीतील फूट : पवारांच्या इंग्रजी आत्मचरित्राचे टायटल आहे, “ऑन माय टर्म्स”; पण मोदी – शाह कधी इतरांच्या टर्म्सवर राजकारण करतात??
- मराठी माध्यमांनी रचला महाविकास आघाडीच्या यशाचा इमला; विनोद तावडेंनी ढासळवला त्याच्या अहवालाचा पाया!!
- ‘’…तेजस्वी यादव यांनी माफियाचे फोटो त्यांच्या कार्यालयात लावावेत’’- गिरीराज सिंह भडकले!
- राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीत अतीक अहमद हत्येवर शरद पवारांचे सूचक भाष्य; यंत्रणांनी कायदा हातात घेऊ नये!!