विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mumbai कथित लाचखोरीच्या रॅकेटप्रकरणी सीबीआयने बुधवारी मुंबईत छापे टाकून दोन आयआरएस अधिकाऱ्यांसह सात जणांना अटक केली. सहविकास आयुक्त सीपीएस चौहान आणि उपविकास आयुक्त प्रसाद वरवंटकर या अधिकाऱ्यांसह ७ जणांचा समावेश आहे.Mumbai
सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक्स एक्स्पोर्ट प्रोसेसिंग झोन येथे लाचखोरी घोटाळ्यात कथित सीबीआयने १७ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत २७ स्थावर मालमत्तेची कागदपत्रे तसेच आरोपींच्या निवासस्थानी ३ वाहने सापडली. चौहानकडून ४० कोटी रुपयांच्या २५ मालमत्तेची कागदपत्रेही जप्त केली. रेखा नायर यांच्या घरातून ६१.५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सिप्ज सेज मुंबई येथे नियुक्त अधिकारी जागावाटप, आयात केलेल्या मालाची विल्हेवाट लावणे, शुल्क न भरता बाजारात आयात मालाची विक्री, मर्जी राखणे या बाबींमध्ये सिप्जमधून काम करणाऱ्या पक्षांकडून मध्यस्थांमार्फत अवाजवी फायदा घेत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
आरोपींची नावे
आयआरएस अधिकारी सहविकास आयुक्त सीपीएस चौहान, उपविकास आयुक्त डॉ. प्रसाद वरवंटकर, सहायक विकास आयुक्त रेखा नायर, सहायक विकास आयुक्त मनीषकुमार, सहायक अधिकारी रवींद्रकुमार, वरिष्ठ लिपिक राजेशकुमार, अधिकारी संजीवकुमार मीणा या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मनोज जोगळेकर व मिथिलेश तिवारी या व्यक्तींचा समावेश.