• Download App
    लखनऊमध्ये प्रियांका गांधींसह शेकडो कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल, कलम 144चे उल्लंघन केल्याचा आरोप । Case Filed Against Congress And Its Activists For Priyanka Gandhi's Dharna In Lucknow

    लखनऊमध्ये प्रियांका गांधींसह शेकडो कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल, कलम 144चे उल्लंघन केल्याचा आरोप

    Priyanka Gandhi’s Dharna In Lucknow : शुक्रवारी कॉंग्रेसच्या सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी गांधी पुतळ्यासमोर केलेल्या निदर्शनांमुळे पोलिसांनी त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. Case Filed Against Congress And Its Activists For Priyanka Gandhi’s Dharna In Lucknow


    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : शुक्रवारी कॉंग्रेसच्या सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी गांधी पुतळ्यासमोर केलेल्या निदर्शनांमुळे पोलिसांनी त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

    हजरतगंजचे एसीपी राघवेंद्र मिश्रा म्हणाले की, लखनऊमध्ये कलम-144 लागू आहे. असे असूनही कॉंग्रेस सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी प्रियांका गांधी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी शुक्रवारी जीपीओ येथे गांधी पुतळ्यासमोर मूक आंदोलन केले.

    निदर्शनादरम्यान गांधी पुतळ्याच्या आवारातील एक खांब तुटला होता. यासंदर्भात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्यासह शेकडो अज्ञात कार्यकर्त्यांविरुद्ध कलम 144 अन्वये कोविड प्रोटोकॉल व सार्वजनिक मालमत्ता प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दीड वर्षानंतर लखनऊला पोहोचलेल्या प्रियंका गांधींनी लखनऊच्या हजरतगंज येथे गांधी पुतळ्यासमोर दोन तास मूक धरणे आंदोलन केले. या वेळी त्यांच्यासमवेत प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यानंतर कॉंग्रेसच्या मुख्यालयात पोहोचलेल्या प्रियांका गांधी म्हणाल्या की, यूपीमधील सरकारच संविधान नष्ट करत आहे. लोकशाहीचे खुलेआम चीरहरण होत आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला थोपवण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी असल्याचे त्यांनी वर्णन केले. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना आणि विकासाच्या बाबतीत यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची खोटी प्रशंसा करत आहेत. जिल्हा पंचायत अध्यक्ष व ब्लॉक प्रमुख निवडणुकीत सरकारने हिंसाचार पसरवल्याचा आरोपही त्यांनी केला.

    Case Filed Against Congress And Its Activists For Priyanka Gandhi’s Dharna In Lucknow

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक