वृत्तसंस्था
चंडीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी आपल्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाला मारून टाकले आहे. काँग्रेसमध्ये होते तोपर्यंत ते सर्वधर्मसमभावाचे प्रतीक होते. परंतु आता ते जातीयवादाला शरण गेले आहेत, असे एकापाठोपाठ एक वार काँग्रेस नेत्यांनी कॅप्टन महेंद्र सिंग यांच्यावर केले आहेत.Captain Saheb “kills” secular Amarinder Singh; Congress leaders rain down one after another
अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून पंजाब मध्ये स्वतंत्र प्रादेशिक पक्ष स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर सर्वच काँग्रेसचे नेते खवळले आहेत. अमरिंदर सिंग यांनी पक्षाबाहेर पडून राजकीय चूक केली आहे. ते शेतकऱ्यांच्या विश्वासघात करणाऱ्या भाजपबरोबर समझोता करत आहेत.
हा पंजाबी जनतेशी विश्वासघात आहे, असा आरोप काँग्रेसचे पंजाब प्रभारी हरीश रावत यांनी केला आहे. अमरिंदर सिंग यांच्या नव्या पक्षामुळे सर्व विरोधकांची मते विभाजित होतील. त्याचा काँग्रेसच्या मतांवर काहीही परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला.
तर दुसरीकडे तिकडे पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग यांनी कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या काँग्रेस सोडण्याला “वैयक्तिक अडचणी” असे संबोधले. त्यांच्यावरील अनेक केसेसनी ते त्रासले आहेत आणि त्यामुळेच त्यांनी काँग्रेस सोडून भाजपाशी घरोबा करण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावा सुखजिंदर सिंग यांनी केला आहे. त्यांच्या सारखे ज्येष्ठ नेते तरी काँग्रेस सोडून गेला असला तरी बाकीचे काँग्रेस आमदार पक्षाशी एकनिष्ठ राहतील, असा दावा देखील सुखविंदर सिंग यांनी केला आहे.
Captain Saheb “kills” secular Amarinder Singh; Congress leaders rain down one after another
महत्त्वाच्या बातम्या
- पीएम मोदींचे सीव्हीसी- सीबीआयच्या संयुक्त परिषदेला संबोधन, म्हणाले, देशाला लुटणारे कितीही शक्तिशाली असले तरी आमचे सरकार त्यांना सोडत नाही!
- तामिळनाडू सरकार मंदिरांमधील 2000 किलो सोने वितळवण्याच्या तयारीत, हिंदू संघटनांचा विरोध, उच्च न्यायालयात स्थगितीसाठी याचिका
- Punjab Congress : मुख्यमंत्री चन्नी यांचे नवजोत सिद्धू यांना आव्हान, मुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी, म्हणाले – दोन महिने मुख्यमंत्री होऊन काम करून दाखवा!
- शिवसेना खा. भावना गवळी आजही ईडीपुढे हजर होणार नाहीत, चिकुनगुनियाचे कारण देत 15 दिवसांची मागितली मुदत