• Download App
    पाकिस्तानी पत्रकार अरूसा आलम हिच्या मुद्द्यावरून कॅप्टन अमरिंदरसिंग आणि पंजाबचे उपमुख्यमंत्री एकमेकांना भिडले!! । Captain Amarinder Singh and the Deputy Chief Minister of Punjab clashed over the issue of Pakistani journalist Arusa Alam !!

    पाकिस्तानी पत्रकार अरूसा आलम हिच्या मुद्द्यावरून कॅप्टन अमरिंदरसिंग आणि पंजाबचे उपमुख्यमंत्री एकमेकांना भिडले!!

    वृत्तसंस्था

    चंडीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि काँग्रेस यांच्यातील वाद राजकीय वाद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक चिघळला असून आता तो पाकिस्तानी पत्रकार अरूसा आलम हिच्या भोवती फिरायला लागला आहे. Captain Amarinder Singh and the Deputy Chief Minister of Punjab clashed over the issue of Pakistani journalist Arusa Alam !!

    अरूसा आलम हिची कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याशी असलेली मैत्री आणि तिचे पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय बरोबर असलेले संबंध याविषयी गेल्या साडे चार वर्षांमध्ये मीडियामध्ये अनेक बातम्या, चर्चा छापून आल्या आहेत. आता याच मुद्द्यावरून कॅप्टन अमरिंदरसिंग आणि पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधवा यांच्या ट्विटर वॉर रंगले आहे. अरूसा आलम हिच्या आयएसआय लिंक्स विषयी भारतीय गुप्तहेर संस्था रॉ ने चौकशी करावी अशी मागणी करणारे ट्विट सुखजिंदर सिंग रंधवा यांनी केले आहे. त्याला कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे मीडिया सल्लागार रविन ठुकराल यांनी प्रती ट्विट करून उत्तर दिले आहे. अरूसा आलम हिचा सोनिया गांधी यांच्याबरोबरचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे.



    अरूसा आलम ही पाकिस्तानी संरक्षण विषय पत्रकार आहे. ती अनेकदा कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासमवेत दिसली आहे. ते मुख्यमंत्री असताना सुखजिंदर सिंग हे त्यांच्या मंत्रिमंडळात होते. परंतु तेव्हा त्यांनी अरूसा आलमबद्दल कधी चकार शब्द काढल्याचे आढळले नाही. आता मात्र अमरिंदरसिंग आणि अरूसा आलम यांच्या संदर्भात त्यांनी ट्विट करून राजकीय वादाला फोडणी दिली आहे.

    या निमित्ताने कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या काळात झालेल्या विविध घोटाळे आणि त्यांच्या चौकशी यांचे नेमके काय झाले?, असे सवालही सुखजिंदर सिंग रंधवा यांनी उपस्थित केले आहेत. परंतु त्या काळात ते स्वतः मंत्रिमंडळात मंत्री होते, हे मात्र सोयीस्कररित्या विसरले आहेत. या सगळ्या राजकीय वादात पंजाबचे राजकारण आता पाकिस्तानी पत्रकार अरूसा आलम हिच्या भोवती फिरायला लागल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.

    Captain Amarinder Singh and the Deputy Chief Minister of Punjab clashed over the issue of Pakistani journalist Arusa Alam !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे