• Download App
    CabinetReshuffle; Narayan Rane, Kapil Patil, Dr. Bhagwat Karad, Dr. Bharati Pawar

    CabinetReshuffle : महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड यांची नावे; हिना गावित, प्रीतम मुंडे यांची नावे नाहीत

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होत असताना महाराष्ट्रातून ज्या डॉ. हिना गावित आणि प्रीतम मुंडे यांची नावे आधी आली होती. ती मागे पडली असून त्यामध्ये शेवटच्या क्षणी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांचा समावेश झाला आहे. CabinetReshuffle; Narayan Rane, Kapil Patil, Dr. Bhagwat Karad, Dr. Bharati Pawar



    मंत्रिमंडळ फेरबदलाच्या यादीत सर्वांत प्रथम नाव नारायण राणे यांचे आले आहे. त्यानंतर कपिल पाटील, डॉ. भागवत कराड आणि त्यानंतर दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्या नावाचा समावेश झाला आहे. डॉ. भारती पवार यांचा समावेश अखेरच्या क्षणी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

    जी. किशन रेड्डी, हरदीप पुरी, किरण रिजिजू, अनुराग ठाकूर, पुरूषोत्तम रूपाला या राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती देण्यात येण्याची संभावना आहे.

    CabinetReshuffle; Narayan Rane, Kapil Patil, Dr. Bhagwat Karad, Dr. Bharati Pawar

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती