जाणून घ्या, कोणत्या सहा राज्यांमध्ये होत आहे निवडणूक ?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सहा राज्यांतील विधानसभेच्या सात जागांसाठी आज म्हणजेच मंगळवारी मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, बंगाल, त्रिपुरा आणि केरळमध्ये या निवडणुका होत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या पोटनिवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाशी (भाजप) मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांच्या ‘I.N.D.I.A’ आघाडीची ही पहिली चाचणी आहे. Bypolls 2023 Voting today in seven assembly constituencies in six states NDA Vs INDIA First collision in
‘I.N.D.I.A’ च्या स्थापनेनंतर ही आघाडी प्रथमच भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. या पोटनिवडणुकांच्या निकालांचा देशाच्या राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो. कारण इतके पक्ष एकत्र आल्यानंतर राज्यातील ही पहिलीच निवडणूक आहे. अशा स्थितीत आपला विजय कायम ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. त्याचवेळी, निवडणूक निकालांच्या आधारे विरोधक आपली रणनीती बदलण्याची शक्यता आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा सामना करण्यासाठी विरोधी पक्षांनी जुलैमध्ये भारतीय राष्ट्रीय विकास समावेशक आघाडी (I.N.D.I.A) ची स्थापना केली.
विधानसभेच्या ज्या सात जागांवर मतदान होत आहे. त्यात उत्तर प्रदेशातील घोसी, उत्तराखंडमधील बागेश्वर, झारखंडमधील डुमरी, बंगालमधील धुपगुरी, केरळमधील पुतुपल्ली आणि त्रिपुरातील बक्सानगर आणि धनपूर यांचा समावेश आहे. या पोटनिवडणुकांसाठी दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार केला असून आज सर्व जागांवर मतदान होत आहे. त्याचा निकाल ८ सप्टेंबरला जाहीर होणार आहे.
Bypolls 2023 Voting today in seven assembly constituencies in six states NDA Vs INDIA First collision in
महत्वाच्या बातम्या
- एक देश एक निवडणूक ही राष्ट्रहिताची असेल’ प्रशांत किशोर यांनी मोदी सरकारच्या भूमिकेचे केले समर्थन
- सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या उदयनिधीवर ममतांची बोटचेपी भूमिका!!
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला दहिहंडी व सार्वजनिक गणेशोत्सव पूर्वतयारीचा आढावा
- लाठीमाराचे आदेश आम्ही दिल्याचे सिद्ध करा, आम्ही राजकारण सोडू; अन्यथा तुम्ही राजकारण सोडा!!; अजितदादांचे आव्हान