• Download App
    ब्रिटनच्या सर्व सीमांवर आता मिळणार डिजीटल व्हिसा, अमेरिकेप्रमाणेच अवलंब।Briton will implement digital visa system

    ब्रिटनच्या सर्व सीमांवर आता मिळणार डिजीटल व्हिसा, अमेरिकेप्रमाणेच अवलंब

    विशेष प्रतिनिधी

    लंडन : स्थलांतरीतांचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी ब्रिटनमध्येही अमेरिकेप्रमाणेच डिजीटल व्हिसाची पद्धत अंमलात आणली जाणार आहे. यानुसार, ब्रिटनच्या सर्व सीमांवर डिजीटल यंत्रणा राबवली जाणार आहे. यामुळे स्थलांतरीतांबरोबरच, मालवाहतूक आणि पर्यटकांवर देखरेख ठेवता येणार असल्याचे माध्यमांनी सांगितले. Briton will implement digital visa system



    ब्रिटनमध्ये विना व्हीसा येऊ इच्छिणाऱ्या लोकांना इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन यंत्रणेच्या माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. याद्वारे दरवर्षी साधारण ३ कोटी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. या यंत्रणेद्वारे तस्करांवरही वचक ठेवता येणार असल्याचे येथील माध्यमांनी सांगितले. ब्रिटनच्या सर्व सीमा २०२५ पर्यंत डिजीटल करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

    ब्रिटनच्या गृहमंत्री प्रिती पटेल यांनी याबाबतच्या आराखड्याला मंजुरी दिली असल्याचे येथील माध्यमांनी सांगितले. जगात आता विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठा वापर केला जात आहे. त्याला कोणतच क्षेत्र मर्यादित नाही. त्यात आता व्हिसाही डिजीटल झाल्यास अनेक बाबी सप्या होण्यास मदत होणार आहेत. डिजीटायजेशनमुळे मावी हस्तक्षेप कमी होतो आणि भ्रष्टाचारास मोठा आळा बसतो.

    Briton will implement digital visa system

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये