वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ब्रिटिश वृत्तपत्र ‘द गार्डियन’ने आपल्या एका रिपोर्टमध्ये भारतावर पाकिस्तानमध्ये टार्गेट किलिंगचा आरोप केला आहे. यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, टार्गेट किलिंग भारताच्या परराष्ट्र धोरणात नाही.British Newspaper Claims- Target Killing by India in Pakistan; External Affairs Minister Jaishankar replied
त्याचवेळी, परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, हे आरोप खोटे असून भारताविरोधात अपप्रचार केला जात आहे.
खरं तर, ब्रिटीश वृत्तपत्राने आपल्या बातमीत लिहिले आहे की, “भारतीय आणि पाकिस्तानी गुप्तचरांनी ‘द गार्डियन’ला सांगितले की, भारत सरकारने परदेशी भूमीवर राहणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून पाकिस्तानमधील अनेक लोकांची हत्या केली.”
अहवालात दावा- पाकिस्तानने टार्गेट किलिंगशी संबंधित कागदपत्रे शेअर केली
‘द गार्डियन’ने आपल्या बातमीत लिहिले आहे की, “दोन्ही देशांच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या मुलाखती आणि पाकिस्तानी तपासकर्त्यांकडून मिळालेल्या दस्तऐवजांवरून स्पष्टपणे दिसून येते की भारताच्या विदेशी गुप्तचर संस्थेने (RAW) 2019 नंतर कथित राष्ट्रीय सुरक्षा कारवाया कशा केल्या आहेत. रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) ) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाच्या नियंत्रणात आहे. मोदी या महिन्यात तिसऱ्या टर्मसाठी निवडणूक लढवत आहेत.”
अहवालानुसार, पाकिस्तानने शेअर केलेल्या कागदपत्रांमध्ये सात प्रकरणांशी संबंधित काही पुरावे आहेत. यामध्ये साक्षीदारांची साक्ष, अटक रेकॉर्ड, आर्थिक विवरण, व्हॉट्सॲप संदेश आणि पासपोर्ट यांचा समावेश आहे. पाकिस्तानी तपासकर्त्यांचे म्हणणे आहे की, या पुराव्यावरून पाकिस्तानी भूमीवर केलेल्या टार्गेट किलिंगमध्ये भारतीय हेरांचा सहभाग स्पष्टपणे दिसून येतो. मात्र, ‘द गार्डियन’ने या कागदपत्रांची पडताळणी केलेली नाही.
अहवालात असे लिहिले आहे की, “2019 मध्ये पुलवामा हल्ल्यापासून, भारतीय गुप्तचर एजन्सी RAW ने 20 हत्या केल्या आहेत. भारताने या सर्वांना आपले शत्रू मानले आहे. नुकतेच भारतावर कॅनडा आणि अमेरिकेत शिखांच्या हत्येचा आरोप आहे. त्यानंतर ही पहिली घटना आहे. जेव्हा भारतीय गुप्तचर अधिकारी पाकिस्तानमधील भारतीय कारवायांवर बोलले.” भारतीय कारवाईचा भाग म्हणून खलिस्तान चळवळीशी संबंधित शीख फुटीरतावाद्यांना पाकिस्तान आणि पाश्चात्य देशांमध्ये लक्ष्य करण्यात आल्याचेही या आरोपांतून स्पष्ट झाले आहे.
पाकिस्तानने म्हटले- भारतीय स्लीपर सेलने ही हत्या केली
अहवालात म्हटले आहे की, “पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी सांगितले की, हत्या UAE मधील भारतीय गुप्तचरांच्या स्लीपर सेलने केल्या आहेत. 2023 मध्ये खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली, कारण या स्लीपर सेल स्थानिक गुन्हेगारांना किंवा गरीब पाकिस्तानी लोकांना खून करण्यासाठी लाखो रुपये देतात.” 2023 मध्ये 15 लोकांची हत्या करण्यात आली होती. त्या सर्वांना अज्ञात हल्लेखोरांनी जवळून गोळ्या घातल्या होत्या.”
अहवालात असा दावाही करण्यात आला आहे की, भारतीय एजंटांनीदेखील जिहादींची कथितपणे हत्या करण्यासाठी भरती केली आणि ते “काफिरांना” मारत असल्याची खात्री पटली.
British Newspaper Claims- Target Killing by India in Pakistan; External Affairs Minister Jaishankar replied
महत्वाच्या बातम्या
- आम्ही घोषणापत्र आणत नाही, आम्ही संकल्पपत्र आणतो’ पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर ओढले ताशेरे
- अखिलेश यादवांची समाजवादी पार्टी अडखळली; उत्तर प्रदेशात एक दोन नव्हे, तब्बल 9 उमेदवार बदलण्याची वेळ!!
- कर्नाटकच्या अपक्ष खासदार सुमलता अंबरीश यांचा भाजपमध्ये प्रवेश
- मुख्तार अन्सारीवर विषप्रयोगाचे आरोप बिनबुडाचे, चौकशी सुरू अहवाल येईल- राजनाथ सिंह