• Download App
    ममता बॅनर्जींचा जीव पडला भांड्यात; भवानीपूर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर|Breaking: EC Announces Bypolls For Bhabanipur Seat in West Bengal

    ममता बॅनर्जींचा जीव पडला भांड्यात; भवानीपूर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर

    वृत्तसंस्था

    कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा जीव अखेर भांड्यात पडला आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक जाहीर केली आहे. ३० सप्टेंबरला तिथे मतदान होईल, तर ३ ऑक्टोबरला मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.Breaking: EC Announces Bypolls For Bhabanipur Seat in West Bengal

    निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ममता बॅनर्जी यांचे मुख्यमंत्री पद वाचण्याची शक्यता असून त्यासाठी त्यांना या पोटनिवडणूकीत विजय मिळवावा लागेल. ही पोटनिवडणूक निवडणूक आयोगाने जाहीर करावी म्हणून ममता बॅनर्जी यांनी केवढी राजकीय मशक्कत केली होती.



    त्यांनी कोरोना बंगालमध्ये आटोक्यात आल्याचा दावा केला होता. आधीच्या केंद्र सरकारला पाठविलेल्या पत्रांमध्ये त्यांनी बंगालमध्ये कोरोना वाढल्याचा दावा केला होता. तो निवडणूक आयोगाला पत्र पाठवून नंतर शिष्टमंडळ पाठवून मागे घेतला. कोरोना आटोक्यात आल्याचा नवा दावा केला.

    कालच आपल्या समर्थकामार्फत त्यांनी कोलकाता हायकोर्टात केंद्रीय गृह मंत्रालय आणि निवडणूक आयोग यांच्यावर दबाव आणण्यासाठी याचिका दाखल केली होती. कोणत्याही स्थितीत सहा महिन्यांच्या आत विधानसभेत निवडणूक येण्याची त्यांची धडपड होती. कारण नाही तर त्यांना राजीनामा द्यावा लागला असता.

    Breaking: EC Announces Bypolls For Bhabanipur Seat in West Bengal

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार