• Download App
    वीर लचित बरफुकन यांच्यावर "जाणता राजा"सारखे महानाट्य तयार करून देशभर न्यावे; पंतप्रधान नरेंद्र मोदींची सूचनाbow to the valorous Lachit Borphukan on his 400th birth anniversary. 

    वीर लचित बरफुकन यांच्यावर “जाणता राजा”सारखे महानाट्य तयार करून देशभर न्यावे; पंतप्रधान नरेंद्र मोदींची सूचना

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : औरंगजेबाच्या मुघल सैन्याचा पराभव करून आसामला मुघली आक्रमणातून मुक्त करणारे वीर लचित बरफुकन यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर असलेले “जाणता राजा” या सारखे महानाट्य तयार करून ते देशभर न्यावे आणि लचित बरफुकन यांच्या पराक्रमाची इतिहास गाथा देशभर सांगावी, अशी महत्वपूर्ण सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लचित बरफुकन यांच्या 400 व्या जयंती महोत्सवात केली. bow to the valorous Lachit Borphukan on his 400th birth anniversary.

    नवी दिल्लीतील विज्ञान भवनात केंद्र सरकार आणि आसाम सरकारने संयुक्तरित्या लचित बरफुकन यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन केले होते. त्या सभेत पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण काढली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची जीवनगाथा सांगणारे “जाणता राजा” हे महानाट्य शिवशाहीर कै. बाबासाहेब पुरंदरे यांनी तयार करून ते देशभर सादर केले आहे. त्यातून असंख्य नागरिकांना देशभक्तीची प्रेरणा मिळाली. याची आठवण पंतप्रधानांनी लचित बरफुकन यांच्या 400 व्या जयंती कार्यक्रमात आवर्जून काढली.

    “जाणता राजा”सारखेच अतिभव्य महानाट्य ललित बरफुकन यांच्यावर तयार करता येऊ शकेल. ते तयार करावे आणि देशभर त्याचे प्रयोग करावेत. यातूनच एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना देशवासीयांच्या मनात रुजेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा, माजी सरन्यायाधीश तरुण गोगोई आदी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत पंतप्रधानांनी वर उल्लेख केलेली जाणता राजा महानाट्य तयार करण्या संदर्भातील सूचना केली.

    bow to the valorous Lachit Borphukan on his 400th birth anniversary.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    सुप्रीम कोर्टात याचिका- NOTA ला जास्त मते पडल्यास निवडणूक रद्द करावी; निवडणूक आयोगाला नोटीस

    काश्मीरच्या सोपोरमध्ये 2 दहशतवादी ठार, 2 जवान जखमी; 2 दिवसांपासून ऑपरेशन सुरू

    काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिला नाही म्हणून नसीम खानांची नाराजी, पण ओवैसींच्या AIMIM ने केली त्यांची गोची!!