विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधिश एन. व्ही. रमणा आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे दोघेही इंग्रजी माध्यमातून शिकलेले नाहीत. आठवीपर्यंत त्यांना इंग्रजीचा गंधही नव्हता असे सर्वोच्च न्यायालयातील एका चर्चेत दोघांनी सांगितले. सरन्यायाधिशांनी तर मी इंग्रजीचा चांगला वक्ता नाही ही आपली कमतरता असल्याचेही सांगितले.Both the Chief Justice of India and the Solicitor General did not learn through English medium
भाषेच्या बाबत ही सगळी चर्चा दिल्लीतील प्रदूषणावरून सुरू झाली. दिल्लीतील वायू प्रदूषणासाठी फक्त शेतकरीच जबाबदार आहेत असे सुचविणाऱ्या मेहता यांना सरन्यायाधिशांनी उत्तर दिले. केवळ शेतकºयांना प्रदूषणासाठी जबाबदार धरणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
या चर्चेत सरन्यायाधिश रमणा म्हणाले, मला शब्द व्यक्त करण्यासाठी चांगले इंग्रजी येत नाही. मी इंग्रजी भाषेत कायद्याचा अभ्यास केला आहे. परंतु, तरीही व्यक्त होताना मला अडचणी येतात.
यावर तुषार मेहता म्हणाले, आपली परिस्थिती सारखीच आहे. माझेही आठवीपर्यंतचे शिक्षण गुजराती माध्यमातून झाले आहे. त्यामुळे वकील म्हणून ज्या भाषेत आमची प्रतिक्रिया घेतली जाते त्या भाषेत चुकीचा संदेश जाऊ शकतो. मात्र, माझा बोलण्याचा ते हेतू नव्हता.
सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआर प्रदेशातील वायू प्रदूषणातील वाढ ही आपत्कालीन परिस्थिती असल्याचेही म्हटले आहे. केंद्र आणि दिल्ली सरकारला हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्यास सांगितले आहे. वाहनांचा वापर रोखणे यासारख्या उपाययोजनांचा त्यामध्ये समावेश आहे.
न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि सूर्यकांत यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने सांगितले की, केवळ शेतकऱ्यांनी पिके जाळणे हेच प्रदूषणाचे कारण नाही. वाहनांमधून होणारे विषारी वायूचे उत्सर्जन, फटाके आणि धूळ यामुळेही प्रदूषण होते.
शेतकऱ्यांकडून पेंढा जाळणे हे केवळ एक कारण आहे. सत्तर टक्के प्रदूषण त्यामुळे होते असे मानू. परंतु, दिल्लीच्या जनतेनेही स्वत:ची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. फटाके, वाहनांचे प्रदूषण यावर नियंत्रणासाठी काय उपाययोजना आहेत? असा सवालही न्यायालयाने केला.पर्यावरण कार्यकर्ते आदित्य दुबे आणि कायद्याचे विद्यार्थी अमन बंका यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना प्रदूषणावर चर्चा झाली.
Both the Chief Justice of India and the Solicitor General did not learn through English medium
महत्त्वाच्या बातम्या
- मला गुजरातीपेक्षा हिंदी भाषा जास्त आवडते, आपल्याला आपली अधिकृत भाषा मजबूत करण्याची गरज आहे – अमित शहा
- MALIK VS WANKHEDE : …त्या कागदपत्रात नंतर अक्षरे घुसडल्याचे साध्या डोळ्यांनाही दिसतं ; नवाब मलिकांनी सोशल केलेल्या वानखेडेंच्या जन्मदाखल्यावर हायकोर्टाची फटकार
- अमरावती शहरात कलम १४४ लागू , जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी दिले जमावबंदीचे आदेश
- Delhi Lockdown:असह्य दिल्ली-परेशान दिल्लीकर! दिल्लीमध्ये प्रदूषणाचा लॉकडाऊन ! नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन…