• Download App
    आसाम आणि मेघालयमध्ये सीमावाद पुन्हा हिंसक वळणावर; दोन्ही बाजूंच्या जमावाचा एकमेकांवर धनुष्यबाण आणि गलोरीने हल्ला|Border Dispute turns violent again in Assam and Meghalaya; The crowd from both sides attacked each other with bows and arrows

    आसाम आणि मेघालयमध्ये सीमावाद पुन्हा हिंसक वळणावर; दोन्ही बाजूंच्या जमावाचा एकमेकांवर धनुष्यबाण आणि गलोरीने हल्ला

    वृत्तसंस्था

    गुवाहाटी : आसाम आणि मेघालय यांच्यातील सीमावादाने पुन्हा एकदा हिंसक वळण घेतले आहे. 26 सप्टेंबर रोजी सीमेजवळील गावात चकमक झाली. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर धनुष्यबाण आणि गलोर तसेच गोफणीने हल्ला केला. या हिंसेचा फोटो-व्हिडिओ बुधवारी व्हायरल झाला.Border Dispute turns violent again in Assam and Meghalaya; The crowd from both sides attacked each other with bows and arrows

    मेघालयातील पश्चिम जयंतिया हिल्स जिल्हा आणि आसाममधील पश्चिम कार्बी आंगलाँग जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या लपंगप गावात ही चकमक झाली. या घटनेत कोणी जखमी झाल्याची माहिती नाही.



    दोन्ही राज्यांतील पोलिस पथकांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक लोकांना शांत केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. बुधवारी सकाळी परिस्थिती शांत पण तणावपूर्ण राहिली कारण दोन्ही राज्यांतील पोलीस दलांनी चकमक झालेल्या ठिकाणी गावकऱ्यांना जमण्यापासून रोखले. ऑक्टोबरमध्ये या मुद्द्यावर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे.

    250 लोक जमले, शेतातून गुप्तपणे हल्ला केला

    लपंगप गावातील रहिवासी डेमोन्मी लिंगडोह यांनी दावा केला की गावातील शेतकरी त्यांच्या भातशेतीची काळजी घेत होते तेव्हा शेतात लपून बसलेल्या आसामच्या माणसांनी त्यांच्यावर गलोर, धनुष्यबाणांनी हल्ला केला.

    “हल्ल्याची माहिती मिळाल्यावर, आमच्या गावातील सुमारे 250-300 लोक जमले आणि त्यांनी धनुष्य, बाण आणि गोफणीने प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे मंगळवारी दिवसभर तणाव निर्माण झाला,” असेही ते म्हणाले.

    Border Dispute turns violent again in Assam and Meghalaya; The crowd from both sides attacked each other with bows and arrows

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ammar Yashar : झारखंडमध्ये पकडलेला दहशतवादी अम्मार याशर, ‘इंडियन मुजाहिदीन’नंतर HUT मध्ये होता सक्रिय

    Terrorist Pannu : पहलगाम हल्ल्यानंतर खलिस्तानी दहशतवादी पन्नूने पुन्हा गरळ ओकली

    Chirag Paswan : जातनिहाय जनगणनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधींना चिराग पासवान यांचा टोला!