• Download App
    बीएन चंद्रप्पा कर्नाटक काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष, विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पक्षाचा महत्त्वाचा निर्णय|BN Chandrappa is the new working president of Karnataka Congress, a major decision for the party in the assembly election frenzy

    बीएन चंद्रप्पा कर्नाटक काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष, विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पक्षाचा महत्त्वाचा निर्णय

    प्रतिनिधी

    बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तयारीदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसने बीएन चंद्रप्पा यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी तत्काळ प्रभावाने नियुक्ती केली आहे. सध्या डीके शिवकुमार कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद सांभाळत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ही नियुक्ती केली आहे.BN Chandrappa is the new working president of Karnataka Congress, a major decision for the party in the assembly election frenzy

    कर्नाटक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आर.के. ध्रुवनारायण यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. आता आर. ध्रुवनारायण यांच्या जागी बीएन चंद्रप्पा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



    कर्नाटक काँग्रेसकडे आता पाच कार्यकारी अध्यक्ष

    कर्नाटक काँग्रेसमध्ये आता प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्याशिवाय पाच कार्याध्यक्ष आहेत. यामध्ये नवनियुक्त बीएन चंद्रप्पा यांच्याशिवाय रामलिंगा रेड्डी, सलीम अहमद, ईश्वर खांद्रे, सतीश जारकीहल्ली यांचा समावेश आहे. राहुल गांधीही सोमवारी कर्नाटकच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अशा स्थितीत त्यांच्या दौऱ्यापूर्वी कर्नाटक काँग्रेसमधील ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. राहुल गांधी कर्नाटकातील कोलार येथे जाहीर सभा घेणार आहेत.

    विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापर्यंत 142 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेस लवकरच इतर जागांसाठीही उमेदवार जाहीर करणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान होणार आहे. आणि 13 मे रोजी निकाल जाहीर होतील.

    BN Chandrappa is the new working president of Karnataka Congress, a major decision for the party in the assembly election frenzy

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amritpal : अमृतपालवरील NSA वर्षभरासाठी वाढवला; २३ एप्रिलपासून लागू होणार, हायकोर्टात अपिलाची तयारी

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!