• Download App
    अश्लिल व्हिडीओ तयार करून शिवसेनेच्या आमदाराला ब्लॅकमेल|Blackmailing Shiv Sena MLA by making obscene videos

    अश्लिल व्हिडीओ तयार करून शिवसेनेच्या आमदाराला ब्लॅकमेल

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुंबईतील दहिसर पोलिस ठाण्यात एका महिलेविरुद्ध ब्लॅकमेलिंग आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अश्लील व्हिडिओ तयार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे.Blackmailing Shiv Sena MLA by making obscene videos

    मागठाण्याचे आमदार सुर्वे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या महिन्यात आपल्याला एका अनोळखी क्रमांकावरून व्हिडिओ कॉल आला होता. कॉल उचलल्यावर एक महिला अश्लील कृत्य करताना दिसले आणि त्यांनी लगेच कॉल डिस्कनेक्ट केला.



    त्यानंतर त्याच क्रमांकावरून फोन करणाऱ्या एका व्यक्तीने आमदाराला अश्लील व्हिडिओ पाठवून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पाच हजार रुपयांची मागणी केली.
    त्यानंतर सुर्वे यांनी दहिसर पोलिस ठाण्यात जाऊन आयपीसी कलम 500 (मानहानी), (गुन्हेगारी धमकी) यासह आयटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला.

    या प्रकरणी अधिक तपास सुरू असून महिलेची ओळख पटली असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकरणांमध्ये रॅकेट काम करत असल्याने लवकरच अनेकांना अटक होण्याची शक्यता आहे.

    यापूर्वी मुंबईतील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका आरोपीला राजस्थानमधील भरतपूर येथून पोलिसांनी अटक केली होती. आरोपींनी यापूर्वी मुंबईतील कुर्ला येथील शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांना व्हिडिओ कॉल करून मदत मागितली होती.

    यानंतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्याचे काम केले जात होते. हा व्हिडिओ रेकॉर्डर अ‍ॅपच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. यानंतर आरोपींनी आमदाराला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आरोपींनी आमदाराकडे 50 हजार रुपयांची मागणीही केली होती. पैसे देण्याऐवजी आमदाराने पोलिसांना कळवले आणि आरोपी पकडला गेला.

    Blackmailing Shiv Sena MLA by making obscene videos

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची