bku bhanu president : भारतीय किसान युनियन (भानु) चे राष्ट्रीय अध्यक्ष भानु प्रताप सिंह यांनी ‘भारत बंद’ची हाक देणाऱ्या शेतकरी संघटनांची तुलना तालिबानशी केली आहे. त्यांनी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला विरोध केला आणि भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांच्यावरही टीका केली. यासोबतच त्यांनी आपल्या संघटनेला या ‘भारत बंद’ला सहकार्य करू नये, असे आवाहन केले. bku bhanu president bhanu pratap singh compares farmers organizations calling for bharat bandh with taliban
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय किसान युनियन (भानु) चे राष्ट्रीय अध्यक्ष भानु प्रताप सिंह यांनी ‘भारत बंद’ची हाक देणाऱ्या शेतकरी संघटनांची तुलना तालिबानशी केली आहे. त्यांनी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला विरोध केला आणि भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांच्यावरही टीका केली. यासोबतच त्यांनी आपल्या संघटनेला या ‘भारत बंद’ला सहकार्य करू नये, असे आवाहन केले.
भानू प्रताप सिंह म्हणाले, “मी भारत किसान युनियन (भानु) चा राष्ट्रीय अध्यक्ष भानु प्रताप सिंह आहे, जे भारत बंदची घोषणा करत आहेत त्यांना मी फक्त एवढेच विचारतो की, ते शेतकऱ्यांच्या कोणत्या फायद्यासाठी हे करत आहेत. तालिबानने अफगाणिस्तानात कब्जा केल्याप्रमाणे त्यांना अशा कारवाया वाढवायच्या आहेत. म्हणून मी भारतीय किसान युनियन (भानु)च्या तालुका ते ब्लॉक, जिल्हा, मंडळ, राज्य, राष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो की भारत बंदला सहकार्य करू नका, बंदला विरोध करा.”
पुढे ते म्हणाले, “मी सरकारला विनंती करतो की 26 जानेवारीपासून आणि आतापर्यंत आपण पाहत असलेल्या अशा संघटना दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहेत त्यांची सरकारने काळजी घ्यावी. त्यांना दडपण्याचा प्रयत्न करा. उत्तर प्रदेश सरकारकडून आणि सर्व राज्यांच्या सरकारांना भानु प्रताप सिंहची ही मागणी आहे.”
केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची घोषणा केली आहे. त्याचा परिणाम पंजाब, हरियाणा आणि देशातील इतर राज्यांमध्ये दिसून आला. पंजाब-हरियाणामध्ये अनेक ठिकाणी महामार्ग आंदोलकांनी बंद केला होता, तर दिल्ली एनसीआरमध्ये पोलिस सज्ज आहेत. दिल्लीच्या गाझीपूर आणि नोएडा सीमेवर तैनाती वाढवण्यात आली.
बंदमुळे रेल्वे सेवेवरही परिणाम झाला. आतापर्यंत दिल्लीशी संबंधित अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. शान-ए-पंजाब नवी दिल्ली ते अमृतसर सकाळी 6.40 वाजता रद्द झाली. नवी दिल्ली-मोगा एक्स्प्रेसही सकाळी 7 वाजता रद्द करण्यात आली. जुनी दिल्ली-पठाणकोट एक्सप्रेसही रद्द करण्यात आली. दिल्लीहून कटराकडे जाणारी वंदे भारत एक्सप्रेस सकाळी 6 वाजता दिल्लीहून निघाली पण ती पानिपत स्टेशनवर उभी राहिली.
bku bhanu president bhanu pratap singh compares farmers organizations calling for bharat bandh with taliban
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान डिजिटल आरोग्य मिशन लाँच : काय आहे हेल्थ कार्ड? ते कसे तयार होणार?, त्याचा फायदा काय? वाचा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर…
- सीमेवर चीन पुन्हा सक्रिय : लडाख सीमेवर तंबू ठोकले; आठ ठिकाणी लष्करी छावण्या, प्रत्येक ठिकाणी ८४ तंबू
- राज्यसभा पोटनिवडणूक अखेर बिनविरोध; काँग्रेसच्या रजनी पाटील यांची निवड निश्चित
- थोरात – नानांची शिष्टाई कामी आली; काँग्रेसला कात्रज घाट दाखविण्याची संधी गेली!!
- महाराष्ट्रातली राज्यसभा पोटनिवडणूक होणार बिनविरोध; भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय घेणार माघार