• Download App
    BJP MAYOR : चंदीगढ महानगरपालिकेत भाजपचा महापौर-रणनिती मात्र महाराष्ट्राची ! काय आहे चंदिगढचं महाराष्ट्र कनेक्शन... । BJP's mayor-strategy in Chandigarh Municipal Corporation, however, belongs to Maharashtra! What is the Maharashtra connection of Chandigarh ...

    BJP MAYOR : चंदीगढ महानगरपालिकेत भाजपचा महापौर-रणनिती मात्र महाराष्ट्राची ! काय आहे चंदिगढचं महाराष्ट्र कनेक्शन…

    चंदीगड महापालिकेत १२ जागा जिंकणाऱ्या भाजपने आपल्या पक्षाचा महापौर बनविला आहे. भाजपच्या सरबजीत कौर चंदीगडच्या महापौर बनल्या आहेत. आम आदमी पक्षाचे एक मत बॅलेट पेपर फाटल्याने रद्द झाले होते. त्यामुळे, निवडणुकीचा निकाल आल्यानंतर आपचे सर्वच नगरसेवक धरणे आंदोलनावर बसले होते. BJP’s mayor-strategy in Chandigarh Municipal Corporation, however, belongs to Maharashtra! What is the Maharashtra connection of Chandigarh …


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : चंदीगढ महानगरपालिकेत भाजपचे कमळ फुलले यात महाराष्ट्राचाही मोठा वाटा आहे.भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे हरियाणाचे प्रभारी आहेत.त्यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदारी पार पाडत या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे .चंदीगढचा विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी ,यांच्या विकासाच्या राजकारणावरील जनतेचा विश्वास असल्याची प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि हरियाणा प्रभारी विनोद तावडे यांनी दिली आहे.

    भारतीय जनता पक्षाने चंडीगड येथे प्रभारी म्हणून राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते विनोद तावडे  यांना नेमले आहे. तावडे यांच्या नेतृत्वात भाजपला निवडणुकीत यश मिळाले नसले तरी महापौरपदी भाजप नेत्याला बसविण्यात तावडेंनी यश मिळवून दाखवले आहे. विशेष म्हणजे भाजपच्या महापौर निवडीचा परिणाम पंजाबच्या आगामी निवडणुकांवरही दिसेल, असेही ट्विटमध्ये तावडेंनी म्हटले आहे.

    आम आदमी पार्टी सर्वांत मोठा पक्ष असतानाही महापौरपद भाजपने त्यांच्याकडून खेचून घेतले आहे. भाजपच्या सरबजित कौर या महापौरपदी विरामान झाल्या आहेत.

    चंदीगड महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) ३५ पैकी १४ जागा जिंकून सगळ्यात मोठ्या पक्षाचे स्थान मिळवले तर भाजपला १२, काँग्रेसला ८ आणि एक जागा शिरोमणी अकाली दलाला जिंकता आली होती. महापौरपदासाठी पक्षाला १९ नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक होता. मात्र, १९ नगरसेवकांचा पाठिंबा मिळविण्यात केजरीवाल यांच्या आपला यश मिळालं नाही. त्यामुळे, चंदीगडमध्ये सर्वात मोठा पक्ष असतानाही आम आदमी पक्षाचा महापौर झालाच नाही. येथे भाजप नेते विनोद तावडेंच्या प्रभारी नेतृत्वात भाजपचा महापौर बनला.

    सिनीयर उपमहापौर पदाच्या खुर्चीवर भाजपच्या दिलीप शर्मा यांनी विजय मिळवला. एकूण २८ मतांपैकी भाजपच्या दिलीप शर्मा यांना १५ तर आम आदमी पक्षाच्या प्रेमलता यांना १३ मत मिळाली. दरम्यान, महापौर पदासाठी केवळ महिलांना अर्ज दाखल करता येत होता. कारण, पहिल्या आणि चौथ्या वर्षासाठी ही जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.

    या निवडणुकीत काँग्रेसचे सात आणि अकाली दलाचा एक असे आठ नगरसेवक तटस्थ राहिले. निवडणुकीत काँग्रेसची कोंडी झाली. कारण भाजपला हरविण्यासाठी ते `आप`ला मतदान करू शकत नव्हते. भाजपचे तेरा नगरसेवक होते. पण तेथील भाजपच्या खासदार किरण खेर या महापालिकेच्याही सदस्य असतात, असा नियम भाजपने दाखवला. त्यामुळे भाजपला तेरा सदस्य निवडून आलेले असताना चौदा मते मिळाली.

    BJP’s mayor-strategy in Chandigarh Municipal Corporation, however, belongs to Maharashtra! What is the Maharashtra connection of Chandigarh …

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य