• Download App
    देशाच्या राजकीय नकाशामध्ये भाजपचे वर्चस्व, पुडूचेरीच्या विजयामुळे 18 राज्ये एनडीएकडे : इंदिरांजींच्या काळात 17 राज्यात होती काँग्रेस|BJP's dominance in the political map of the country,

    देशाच्या राजकीय नकाशामध्ये भाजपचे वर्चस्व : पुडूचेरीच्या विजयामुळे १८ राज्ये एनडीएकडे ; इंदिरांजींच्या काळात १७ राज्यात होती काँग्रेस

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पाच राज्यातील निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. त्यात पुडूचेरीत भाजपची राजवट आली आहे. त्यामुळे भारताच्या राजकीय नकाशात भाजप आणि एनडीए आघाडीचा फायदा झाला आहे त्यामुळे भाजप शासित राज्यांची संख्या आता 18 होणार आहे.BJP’s dominance in the political map of the country,

    यापूर्वी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बिहार निवडणुकीनंतर 49 टक्के लोकसंख्या आणि 52 टक्के क्षेत्र असलेल्या 17 राज्यात भाजपची सत्ता होती. त्या तुलनेत पुडूचेरी हा छोटा प्रदेश आहे. केवळ 14 लाख लोकसंख्या आणि 483 चौरस किलोमीटरचा हा भूभाग आहे.



    2018 मध्ये भाजपप्रणित एनडीएचे 21 राज्यात सरकार होते.71 टक्के लोकसंख्या आणि 80 टक्के क्षेत्रावर भाजप सत्तेवर होते. याची तुलना इंदिरा गांधी यांच्या काळखंडाशी केली जात आहे. कारण त्यावेळी अनेक राज्यात काँग्रेसची राजवट होती.

    विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा एनडीएची तुलना इंदिरा गांधी यांच्या राजवटीशी केली होती. 2017 मध्ये गुजरात आणि हिमाचल प्रदेश भाजपने जिंकला तेव्हा मोदी यांनी संसदीय दलाच्या बैठकीत मोठ्या गर्वाने सांगितले होते की, इंदिरा गांधी

    सत्तेवर असताना 18 राज्यात काँग्रेसची सत्ता होती. ( वास्तविक 17 राज्यात काँग्रेस सत्तेवर होती), पण, आम्ही सत्तेवर आलो जेव्हा भाजप 19 राज्यात सत्तेवर आला आहे.

     

    BJP’s dominance in the political map of the country

    विशेष बातम्या 

     

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये