मनोज सोनकर यांची चंदीगडचे नवे महापौर म्हणून निवड झाली आहे
विशेष प्रतिनिधी
चंदीगड : चंदीगडमध्ये आज म्हणजेच मंगळवारी महापौरपदाची निवडणूक पार पडली, त्यात भाजपने बाजी मारली. मनोज सोनकर यांची चंदीगडचे नवे महापौर म्हणून निवड झाली आहे. त्यांनी आम आदमी पक्षाचे कुलदीप कुमार यांचा पराभव केला.BJP wins in Chandigarh Mayoral election big blow to Congress and AAP alliance
सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी एनडीए आणि इंडिया ब्लॉक यांच्यातील हा पहिला संघर्ष होता. कडेकोट बंदोबस्तात ही निवडणूक पार पडली. चंदीगड महापालिकेच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय बॅरिकेड्स लावण्यात आले होते. महापालिकेच्या इमारतीभोवती तिहेरी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.
निवडणुकीदरम्यान 800 सैनिक तैनात करण्यात आले होते. चंदीगड पोलिसांचे 600 कर्मचारी, ITPB आणि रॅपिड ॲक्शन फोर्सचे प्रत्येकी 100 कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
यापूर्वी ही निवडणूक 18 जानेवारीला होणार होती, मात्र पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांच्या आजारपणामुळे चंदीगड प्रशासनाने ती 6 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली होती. मात्र, काँग्रेस आणि आपच्या नगरसेवकांनी या निर्णयाला विरोध केला. 35 सदस्यांच्या महापालिका सभागृहात आप आणि काँग्रेस आघाडीकडे मिळून 20 मते असून, भाजपच्या 15 मतांपुढे कडवे आव्हान होते. यामध्ये 14 नगरसेवक आणि खासदार किरण खेर यांच्या अतिरिक्त मतांचा समावेश आहे.
BJP wins in Chandigarh Mayoral election big blow to Congress and AAP alliance
महत्वाच्या बातम्या
- राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर; 27 फेब्रुवारीला मतदान, निवडणूक आयोगाची माहिती
- गांधी हत्येच्या दीर्घकालीन दुष्परिणामातून भारताचे व्यापार, संरक्षण आणि परराष्ट्र धोरण ब्रिटिश अंकितच; रणजित सावरकरांचा आरोप!!
- श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेला हजर राहणाऱ्या इमामांविरुद्ध धमक्यांचा फतवा; इमाम आपल्या भूमिकेवर ठाम!!
- मराठा आरक्षण बलिदान (आत्महत्या) 80 बांधवांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून प्रत्येकी 10 लाखांची मदत!!